व्हॉलिबाॅलपटू निकिता शेळके हिची राष्ट्रीय पातळीवर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:06 IST2021-03-09T04:06:32+5:302021-03-09T04:06:32+5:30

राज्यपातळीवरील १८ वर्षांखालील मुलींच्या व्हॉलिबॉल स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. त्यात कोल्हापूर विभागावर मात करीत मराठवाडा विभागाने दणदणीत यश संपादन ...

National selection of volleyball player Nikita Shelke | व्हॉलिबाॅलपटू निकिता शेळके हिची राष्ट्रीय पातळीवर निवड

व्हॉलिबाॅलपटू निकिता शेळके हिची राष्ट्रीय पातळीवर निवड

राज्यपातळीवरील १८ वर्षांखालील मुलींच्या व्हॉलिबॉल स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. त्यात कोल्हापूर विभागावर मात करीत मराठवाडा विभागाने दणदणीत यश संपादन केले. हा सामना जिंकून देण्यात निकिता शेळके हिचा वाटा मोठा आहे. तिने खेळलेल्या तिन्ही सामन्यांतील उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर तिची राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलिबॉलच्या स्पर्धेसाठी पंचांनी तिची निवड केली आहे. राष्ट्रीय पातळीवर मराठवाडा विभागातून निवड झालेली ती एकमेव खेळाडू आहे. निकिताने या पूर्वी पण विभागीय पातळीपर्यंत मजल मारली आहे. निकिताला सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक प्रदीप महाजन यांचे मार्गदर्शन लाभले होते. निकिताच्या निवडीबद्दल शालेय समितीचे अध्यक्ष नरेंद्र अग्रवाल, सदस्य सुभाष साखला, पं. स.चे उपसभापती काकासाहेब राकडे, प्रभारी मुख्याध्यापक संजय दाभाडे, माजी मुख्याध्यापक सुभाष साळवे, आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे कौतुक केले.

फोटो : निकिता शेळके

Web Title: National selection of volleyball player Nikita Shelke