नाथनगरी भक्तीने दुमदुमली
By Admin | Updated: March 29, 2016 00:54 IST2016-03-29T00:13:49+5:302016-03-29T00:54:19+5:30
पैठण : ‘भानुदास-एकनाथ’ नामाचा जयघोष करीत शेकडो किलोमीटर अंतर पायी आलेल्या वारकऱ्यांच्या दिंड्या सोमवारी दुपारनंतर पैठण नगरीत दाखल होण्यास प्रारंभ झाला.

नाथनगरी भक्तीने दुमदुमली
पैठण : ‘भानुदास-एकनाथ’ नामाचा जयघोष करीत शेकडो किलोमीटर अंतर पायी आलेल्या वारकऱ्यांच्या दिंड्या सोमवारी दुपारनंतर पैठण नगरीत दाखल होण्यास प्रारंभ झाला. दिंड्यांसह आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीने पैठण नगरी गजबजून गेली.
साडेचारशे वर्षांची परंपरा असलेल्या शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी सोहळ्यास तुकाराम बीजेपासून प्रारंभ झाला आहे. नाथांच्या वाड्यातील ज्या रांजणात भगवान श्रीकृष्णांनी कावडीने वाहून पाणी भरले त्या रांजणाच्या पूजनाने व तो भरण्यास प्रारंभ करून नाथषष्ठी सोहळ्यास प्रारंभ झाला. (पान २ वर)