शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

नाशिकचे पाणी जायकवाडीत दाखल; २४ तासात पाणीपातळीत मोठी वाढ; पाणीसाठा ४० टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 19:50 IST

आजही नाशिक जिल्ह्यास पावसाने झोडपून काढल्याने धरणात येणारी आवक वाढती राहील

पैठण (औरंगाबाद): नाशिकच्या पुराचे पाणी दाखल झाल्याने गेल्या २४ तासात जायकवाडीच्या पाणीपातळीत पाऊन फुटाने वाढ झाली असून ५६.१९ दलघमी ( २ टीएमसी) पाण्याची भर पडली आहे. मंगळवारी रात्री धरणात ४५९३८ क्युसेक्स अशा मोठ्या क्षमतेने आवक सुरू होती. वरच्या धरणातील विसर्ग लक्षात घेता आवक वाढणार असल्याचे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. दरम्यान धरणाचा जलसाठा मंगळवारी सायंकाळी ४०%  पेक्षा जास्त झाला होता.

नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून सोडलेले पाणी सोमवारी मध्यरात्री जायकवाडी धरणात येऊन धडकले. जायकवाडी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून अतिवृष्टी सुरू असून तेथील धरणातून गोदावरी पात्रात मोठ्या क्षमतेने विसर्ग सुरू आहेत. जायकवाडी धरणात मंगळवारी सकाळपासून  आवक वाढत असल्याचे दिसून आले सायंकाळी ७ वाजेस धरणात ४५९३८ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू होती. आवक वाढणार असल्याने धरणाच्या पाणीपातळीत गतीने वाढ होणार असल्याचे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले. 

मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील धरण समुहापैकी दारणा धरणातून १५०८८ क्युसेक्स, कडवा धरणातून ३५१७ क्युसेक्स, गंगापूर धरणातून १००३५ क्युसेक्स असा मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात येत होता.  या सर्व धरणातील पाणी नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात येते. तेथून गोदावरी पात्रात ७८२७६ क्युसेक्स अशा मोठ्या क्षमतेने गोदावरी पात्रात मंगळवारी विसर्ग  वाढविण्यात आल्याने गोदावरी नदीला पुर आला आहे. प्रशासनाने नाशिक ते गंगापूर पर्यंत गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे. जायकवाडी धरणाच्या वर असलेल्या वैजापूर तालुक्यातील नागमठाण येथील सरिता मापन केंद्रावर गोदावरी नदी ६२८०० क्युसेक्स क्षमतेने वहात असल्याची माहिती धरण अभियंता विजय काकडे यांनी दिली. १५२२ फूट जलक्षमता असलेल्या धरणाची पाणी पातळी मंगळवारी रात्री ७ वा १५०८.७५ फूट  ईतकी झाली होती. धरणात उपयुक्त जलसाठा ८६१.८६४ दलघमी झाला होता. आजही नाशिक जिल्ह्यास पावसाने झोडपून काढल्याने धरणात येणारी आवक वाढती राहील असे धरण नियंत्रण कक्षातून सहायक अभियंता गणेश खराडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीRainपाऊसAurangabadऔरंगाबाद