अरुंद पुलावरुन दुचाकी पडली

By Admin | Updated: June 10, 2014 00:15 IST2014-06-10T00:02:58+5:302014-06-10T00:15:37+5:30

येलदरी : जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाजवळील अरुंद पुलावरुन दुचाकीसह तिघेजण पुलावरुन खाली पडून गंभीर जखमी झाले. ९ जून रोजी सायंकाळी ६़४५ वाजता ही घटना घडली़

A narrow bolt from the narrow bridge | अरुंद पुलावरुन दुचाकी पडली

अरुंद पुलावरुन दुचाकी पडली

येलदरी : जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाजवळील अरुंद पुलावरुन दुचाकीसह तिघेजण पुलावरुन खाली पडून गंभीर जखमी झाले. ९ जून रोजी सायंकाळी ६़४५ वाजता ही घटना घडली़
सोमवारी ज्ञानदेव सूर्यकांत अंभोरे (वय ३५), बबन हरिभाऊ मोरे (४०) व दादाराव आश्रोजी नवघरे (सर्व रा. रिसोड) हे तिघे एका दुचाकीवरुन येलदरी येथून रिसोडकडे निघाले. त्यांची दुचाकी येलदरी धरणाजवळील अरुंद पुलावर आल्यानंतर दुचाकीस्वाराचा गाडीवरील ताबा सुटला आणि तिघेही दुचाकीसह पुलावरून खाली पडले़ यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले़ ही घटना सोमवारी सायंकाळी ६़४५ वाजता घडली़
या घटनेची माहितीे येलदरी येथील शेषराव चव्हाण व अनंत माकोडे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुलाखाली पाण्यात पडलेल्या जखमींना बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले़ परंतु, त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्याने जखमींना रुग्णवाहिकेतून जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयातात दाखल केले़ जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर ज्ञामदेव अंभोरे व बबन मोरे या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना परभणी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे़ (वार्ताहर)
बळी घेतल्यानंतर पुलाचे काम होणार का ?
जिंतूर- रिसोड महामार्गाला जोडणारा पूल येलदरी धरणाजवळ ४० ते ५० वर्षांपूर्वी बांधलेला आहे. हा पूल अरुंद आहे़ त्यामुळे या पुलावरुन जड वाहतूक होत नाही़ एका वेळी एकच मोठे वाहन पुलावरून जाते़ त्यामुळे या पुलावर दररोज छोटे-मोठे अपघात होत आहे़ गेल्यावर्षी या पुलावर बसचालकाचा ताबा सुटल्याने पुलावरून बस खाली पडली होती. यामध्ये एका वृद्धाचा मृत्यू झाला़ त्यानंतर १७ मे रोजी एका ट्रेलरने या पुलावरील सगळे कठडे तोडून टाकले़ त्यामुळे हा पूल आणखीच अरुंद झाला आहे़ पुलाला कठडे नसल्याने दुचाकीस्वार पुलावरुन नदीत पडले़ पुलाखाली पाणी असल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही़ अशा घटना होऊनही बांधकाम विभागाला देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे़
नवीन पुलाचे काम कधी होणार?
येलदरी धरणाजवळी पूल अरुंद असल्याने जड वाहतूक करणे अवघड झाले आहे़ हा पूल मराठवाडा व विदर्भाला जोडणार असून या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे़ एखादी जीवित हानी झाल्यानंतरच नवीन पुलाचे काम सुरू होत की काय? असा प्रश्न ग्रामस्थांमधून केला जात आहे़

Web Title: A narrow bolt from the narrow bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.