शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मुकुट सलग दुसऱ्या वर्षी मराठवाड्याला

By सुमेध उघडे | Updated: November 8, 2022 17:32 IST

९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे.

औरंगाबाद: ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. हे साहित्य संमेलन वर्धा येथे होणार आहे. उदगीरला झालेल्या ९५ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे होते. मराठवाड्याला अध्यक्षपदाचा सलग दुसऱ्यांदा बहुमान मिळाला आहे. 

संमेलनाध्यक्षपदी  खासदार दत्ता मेघे यांची निवड करण्यात आली असून या संमेलनाच्या संरक्षकपदाची जबाबदारी माजी आ. सागर मेघे यांनी स्वीकारली आहे. वर्धा जिल्ह्यात तब्बल ५६ वर्षांनी सारस्वतांचा महामेळा पुन्हा अनुभवता येणार आहे. वर्धा जिल्ह्याला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. हा जिल्ह्याला ऐतिहासिकदृष्ट्या महत्व आहे. १९६७ मध्ये वर्ध्यात ४८ वे संमेलन झाले होते. आता २०२३ मध्ये म्हणजेच जवळपास ५६ वर्षांनी ही संधी वर्ध्याला पुन्हा मिळाली आहे. वर्ध्यातील स्वावलंबी महाविद्यालयाच्या मैदानावर हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. हे साहित्य संमेलन दिनांक ३, ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत वर्धा येथील स्वावलंबी शाळेच्या भव्य पटांगणावर आयोजित होणार आहे.

सलग दुसऱ्यावर्षी मराठवाड्यातील अध्यक्षकोरोना महामारीनंतर दोन वर्षाच्या खंडानंतर ९४ वे साहित्य संमेलन नाशिकमध्ये पार पडले होते. त्यानंतर केवळ चार महिन्यानंतर ९५ वे साहित्य संमेलन उदगीर येथील उदगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात २२ ते २४ एप्रिल दरम्यान पार पडले. यावेळी अध्यक्ष भारत सासणे होते तर आता ९६ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना मिळाला आहे. विशेष म्हणजे हे दोघेही मराठवाड्यातील आहेत. यामुळे सलग दुसऱ्यावर्षी अध्यक्ष पदाचा मान मराठवाड्याला मिळाला आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळliteratureसाहित्य