शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

नारेगाव कचरा डेपो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:10 AM

नारेगाव कचरा डेपोच्या पायथ्याशी शेतकºयांनी शुक्रवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. मागील २४ तासांमध्ये कचºयाची एकही गाडी कचरा डेपोवर आंदोलकांनी येऊ दिली नाही. शनिवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी द्यावा, अशी नम्रपणे विनंती केली. आंदोलकांनी ही मागणीही फेटाळून लावली. आमच्या मागणीचा विचार करावा, असा प्रस्तावही जिल्हाधिकाºयांनी मांडला.

ठळक मुद्दे‘त्रिमूर्ती’ची विनंतीही फेटाळली : जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व मनपा आयुक्तांनी मागितली होती मुदतवाढ...

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नारेगाव कचरा डेपोच्या पायथ्याशी शेतकºयांनी शुक्रवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. मागील २४ तासांमध्ये कचºयाची एकही गाडी कचरा डेपोवर आंदोलकांनी येऊ दिली नाही. शनिवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी द्यावा, अशी नम्रपणे विनंती केली. आंदोलकांनी ही मागणीही फेटाळून लावली. आमच्या मागणीचा विचार करावा, असा प्रस्तावही जिल्हाधिकाºयांनी मांडला.नारेगाव, मांडकी, गोपाळपूर आदी भागातील शेतकºयांनी एकत्र येऊन नारेगाव येथील जुना कचरा नष्ट करावा, नवीन कचरा येथे आणून टाकण्यात येऊ नये या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे.आंदोलनाच्या दुसºया दिवशी सकाळीच महापौर नंदकुमार घोडेले, सभापती गजानन बारवाल, उपमहापौर विजय औताडे, माजी सभापती राजू शिंदे, सभागृहनेता विकास जैन यांनी आंदोलकांची भेट घेऊन समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. त्यानंतर लगेचच आयुक्त डी.एम. मुगळीकर नारेगाव येथे पोहोचले. त्यांनी तब्बल एक तास आंदोलकांसोबत चर्चा केली. मागील तीन ते चार महिन्यांमध्ये कचºयावर प्रक्रिया करणे, नवीन यंत्र सामुग्री खरेदी करण्यासाठी विविध परवानग्या घेण्यात आल्या आहेत. ही सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आंदोलकांनी दोन महिन्यांचा अवधी दिल्यास हा परिसर नंदनवन होईल, असे नमूद केले.या पाठोपाठ जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त यशस्वी यादव आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाले. गावकºयांसोबत तब्बल २० मिनिटे चर्चा करण्यात आली. दीड महिन्यांची परवानगी द्यावी, अशी विनंती यादव यांनी केली. मनपा आयुक्त लेखी आश्वासन देतील, असेही त्यांनी सांगितले. गावकरी या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करीत असताना एक तथाकथित नेते तेथे पोहोचले. त्यांनी जोरदार भाषण ठोकून सकारात्मक चर्चेला वेगळे वळण दिले. त्यामुळे चर्चा निष्फळ ठरली. रविवारी परत आंदोलकांसोबत चर्चा करण्यात येणार असल्याचे महापौर घोडेले यांनी नमूद केले.४० टक्के कचरा जिरविलाशुक्रवारी जमा केलेला कचरा मध्यवर्ती जकात नाक्यावर वाहनातच पडून आहे. आता या भागात दुर्गंधी सुटली आहे. रविवारपासून या भागात राहणाºया नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागेल. शनिवारी मनपाने ४० टक्के कचरा उचलला. हा कचरा विविध वॉर्डांमध्ये शोषखड्डे करून जिरवण्यात आला. उर्वरित ६० टक्के कचरा विविध वॉर्डांमध्ये पडून आहे. रविवारीही बहुतांश कचरा पडून राहणार आहे. सोमवारी शहरात कचरा प्रश्नावर मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तुमची बदली झाली तर...जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त आज लेखी आश्वासन देतो असे नारेगावच्या आंदोलकांना सांगितले. येणाºया दोन महिन्यांत तुमच्या बदल्या झाल्या तर आम्ही काय करावे? या थेट प्रश्नावर तिन्ही अधिकारी निरुत्तर झाले. एकाचवेळी तिघांच्या बदल्या होणार नाहीत, असे जिल्हाधिकाºयांनी नमूद केले.चिकलठाण्यात कचरा डेपोला विरोधशुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून नारेगावच्या शेतकºयांनी आंदोलन पुकारल्यानंतर महापालिकेने पैठण रोडवर बाभूळगाव येथे एका खाजगी कंपनीच्या जागेवर कचºयावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. २० ट्रक कचरा टाकल्यानंतर या डेपोला विरोध झाला. मनपाने त्वरित मिटमिट्यात सफारी पार्ककडे मोर्चा वळविला. येथेही तीच परिस्थिती होती.शनिवारी सकाळी ७ वाजता चिकलठाण्यात मनपाच्या मालकीच्या जागेवर कचरा टाकण्याचा प्रयत्न झाला. यालाही गावकºयांकडून कडाडून विरोध झाला. जिथे तिथे विरोधाचे झेंडे दिसू लागल्याने मनपा प्रशासन आता मेटाकुटीला आले आहे.