नांदेडच्या पथकाने नोंदविले ५७ जणांचे जबाब
By Admin | Updated: June 3, 2014 00:47 IST2014-06-03T00:32:50+5:302014-06-03T00:47:01+5:30
उस्मानाबाद : पोलिस कर्मचार्यांनी कनगरा येथे केलेल्या अमानुष लाठीहल्ला प्रकरणी नांदेड येथील पथकाने रविवारी रात्री उशिरापर्यंत व सोमवारी दुपारपर्यंत ग्रामस्थांचे जबाब नोंदविले़

नांदेडच्या पथकाने नोंदविले ५७ जणांचे जबाब
उस्मानाबाद : पोलिस कर्मचार्यांनी कनगरा येथे केलेल्या अमानुष लाठीहल्ला प्रकरणी नांदेड येथील पथकाने रविवारी रात्री उशिरापर्यंत व सोमवारी दुपारपर्यंत ग्रामस्थांचे जबाब नोंदविले़ उपविभागीय पोलिस अधिकारी दर्जाच्या अधिकार्यांसह १० ते १२ जणांनी ४६ पुरूष, ११ महिलांचे जबाब नोंदवून घेतले़ जबाब नोंदवून घेताना पोलिस अधिकार्यांसह स्थानिक पदाधिकार्यांनाही दूर ठेवत मोठी गुप्तता बाळगण्यात आली़ अवैैध दारूबंदीच्या मागणीवरून पोलिस कर्मचारी आणि कनगरा ग्रामस्थांमध्ये २६ मे रोजी बाचाबाची होवून हाणामारी झाली होती़ यानंतर उस्मानाबादेतून आलेल्या अधिकारी, कर्मचार्यांनी पहाटेपर्यंत ग्रामस्थांना घराबाहेर काढत अमानुष मारहाण केली होती़ दरम्यान, प्रकरणाची गंभिरता लक्षात घेता गृह विभागाने बेंबळी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह इतर तीन कर्मचार्यांना तडकाफडकी निलंबीत केले़ गृहमंत्री आऱआऱपाटील यांनी कनगरा ग्रामस्थांची भेट घेवून सर्वच दोषी अधिकार्यांसह कर्मचार्यांवर अहवाल आल्यानंतर कठोर कारवाईसह गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे़ दरम्यान, नांदेड येथील डीवायएसपी दर्जाच्या काही अधिकार्यांसह १० ते १२ जणांचे पथक रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कनगरा येथे दाखल झाले होते़ कनगरा ग्रामपंचायतीत संबंधित नागरिकांना वन-टू-वन बोलावून त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात येत होता़ या पथकाने रात्री उशिरापर्यंत काहींचे जबाब नोंदवून घेतले़ तर सोमवारी दुपारपर्यंत जबाब नोंदवून घेतले़ पथकाने ४६ पुरूष व ११ महिलांचे जबाब नोंदवून घेतल्याचे समजते़ (प्रतिनिधी) अधिवेशनाकडे लक्ष विरोधी पक्षनेते विनोद तावडे, मनसेचे गटनेता आ़बाळा नांदगावकर, शिवसेनेचे खा़ रवींद्र गायकवाड, आ़ ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी कनगरा ग्रामस्थांची भेट घेवून लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे़ तावडे, नांदगावकर यांनी हे प्रकरण अधिवेशनात लवून धरत संबंधित अधिकार्यांसह कर्मचार्यांवर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे़ त्यामुळे दोन जून पासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाकडे कनगरा ग्रामस्थांसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़