डॉक्टरांच्या राज्यव्यापी संपाला नांदेडात पाठींबा
By Admin | Updated: April 9, 2016 00:36 IST2016-04-09T00:34:57+5:302016-04-09T00:36:44+5:30
नांदेड : मुंबईच्या जे़ जे़ रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात नांदेडच्या डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनीही पाठींबा दर्शविला

डॉक्टरांच्या राज्यव्यापी संपाला नांदेडात पाठींबा
नांदेड : मुंबईच्या जे़ जे़ रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात नांदेडच्या डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनीही पाठींबा दर्शविला असून शुक्रवारी सकाळी आठ वाजेपासून येथील ११० निवासी डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत़ संपातून अत्यावश्यक सेवा मात्र वगळण्यात आली आहे़
जे़ जे़ रुग्णालयातील प्रकरणावर अद्याप तोडगा निघाला नसल्यामुळे निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने मुंबई येथे संप पुकारला आहे़ या संपाला पाच दिवसांचा कालावधी लोटला आहे़ त्यानंतर मार्डने राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे़ त्यानुसार शुक्रवारपासून राज्यभरातील साडे चार हजार निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत़
त्यात नांदेडातील ११० डॉक्टरांचाही समावेश आहे़ सकाळपासून डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी संपकरी डॉक्टर उपस्थित आहेत़ या संपातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली असून अपघात विभागाच्या ठिकाणी निवासी डॉक्टर कार्यरत आहेत़ याबाबत मार्डचे अध्यक्ष डॉ़ संजय मुत्तेपोड म्हणाले, शासनाने मार्ड संघटनेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच संप पुकारण्याची वेळ आली आहे़ राज्यव्यापी संपाला नांदेडातही पाठींबा देण्यात येत आहे़ परंतु अत्यावश्यक सेवेवर या संपाचा परिणाम होणार नाही़ याचीही काळजी घेण्यात येत आहे़ दरम्यान, महाविद्यालय प्रशासनाने रुग्णांची गैरसोय होवू नये म्हणून पर्यायी व्यवस्था सज्ज ठेवली आहे़