हर्षमितसिंगच्या कामगिरीने नांदेडच्या १९0 धावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 01:09 IST2017-12-23T01:08:43+5:302017-12-23T01:09:27+5:30
हर्षमितसिंग कापसे याच्या झुंजार खेळीच्या बळावर नांदेडने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या १४ वर्षांखालील निमंत्रित संघांच्या दोनदिवसीय लढतीत औरंगाबादविरुद्ध १९0 धावा केल्या. फिरकी गोलंदाज ऋषिकेश कुंदे यानेही आज सुरेख गोलंदाजी करताना औरंगाबादतर्फे ठसा उमटवला.

हर्षमितसिंगच्या कामगिरीने नांदेडच्या १९0 धावा
औरंगाबाद : हर्षमितसिंग कापसे याच्या झुंजार खेळीच्या बळावर नांदेडने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या १४ वर्षांखालील निमंत्रित संघांच्या दोनदिवसीय लढतीत औरंगाबादविरुद्ध १९0 धावा केल्या. फिरकी गोलंदाज ऋषिकेश कुंदे यानेही आज सुरेख गोलंदाजी करताना औरंगाबादतर्फे ठसा उमटवला.
प्रथम फलंदाजी करणाºया नांदेडने ७१ षटकांत सर्वबाद १९0 धावा फटकावल्या. त्यांच्याकडून सुरेख कव्हरड्राईव्ह व पूलचे नेत्रदीपक फटके मारणाºया व सातव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या हर्षमितसिंग कापसे याने ११४ चेंडूंत ७ चौकारांसह नाबाद ४८ धावांची खेळी केली. गौरवप्रसाद अल्लमखाने याने ४0 चेंडूंत २७, विश्वसेन गोडबोले याने १0७ चेंडूंत ३0 धावांची खेळी केली. औरंगाबादच्या गोलंदाजांनी त्यांना ३८ धावा या अवांतर स्वरूपात दिल्या. औरंगाबादकडून फिरकी गोलंदाज ऋषिकेश कुंदे याने सर्वाधिक ४0 धावांत ३ गडी बाद केले. आशितोष पारे व तनुज साळुंके यांनी प्रत्येकी २, तर कार्तिक बालय्या, सागर पवार व अंश ठोकळ यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात दिवसअखेर औरंगाबादने १७ षटकांत ३२ धावांत ३ फलंदाज गमावले. अंश ठोकळ ६ व संकेत पाटील ३ धावांवर खेळत होते. नांदेडकडून अखिल मिर्झा, आनंद आढाव, हर्षमितसिंग कापसे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
नांदेड : ७१ षटकांत सर्वबाद १९0. (हर्षमितसिंग कापसे नाबाद ४८, विश्वसेन गोडबोले ३0, गौरवप्रसाद अल्लमखाने २७. ऋषिकेश कुंदे ३/४0, तनुज साळुंके २/४४, आशितोष पारे २/४६, कार्तिक बालय्या १/२५, सागर पवार १/५, अंश ठोकळ १/३).