सट्ट्याचे नांदेड, धर्माबाद कनेक्शन

By Admin | Updated: May 31, 2016 00:40 IST2016-05-31T00:16:49+5:302016-05-31T00:40:46+5:30

औरंगाबाद : आयपीएल सामन्यांवर खेळल्या जाणाऱ्या सट्टेबाजीचा रविवारी रात्री गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. सट्टेबाजीतील प्रमुख बुकी हे नांदेड,

Nanded of Netaji, Dharmabad connection | सट्ट्याचे नांदेड, धर्माबाद कनेक्शन

सट्ट्याचे नांदेड, धर्माबाद कनेक्शन


औरंगाबाद : आयपीएल सामन्यांवर खेळल्या जाणाऱ्या सट्टेबाजीचा रविवारी रात्री गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. सट्टेबाजीतील प्रमुख बुकी हे नांदेड, धर्माबाद येथील असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
आयुक्त म्हणाले की, आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा चालविणाऱ्या अड्ड्यावर रविवारी रात्री आर्थिक गुन्हे शाखा आणि शहर गुन्हे शाखा यांनी संयुक्त कारवाई केली. याप्रकरणी प्रमुख आरोपी नरेश पोतलवाड, अजित आगळे आणि प्रकाश ठोले यांना अटक केली आहे. पोलिसांनी छापा मारला त्यावेळी पोतलवाड याच्या मिनी टेलिफोन एक्स्चेंजशी ३८ बुकी आॅनलाईन संपर्कात होते. या बुकींच्या नावाची यादी आणि पत्ते पोलिसांनी मिळविले आहेत. त्याआधारे त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे. नरेश हा बुकींकडून प्रतिलाईन पाच हजार रुपये भाडे आकारत असे. त्याच्याकडून मिनी टेलिफोन एक्स्चेंज आणि मोबाईल जप्त करून गुन्हे दाखल करण्यात आले. पत्रकार परिषदेला पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, पो.नि.मधुकर सावंत उपस्थित होते.४
जालना रोडवरील आकाशवाणी चौक प्रायोगिक तत्त्वावर सायंकाळी बंद ठेवण्यात येत आहे. यास आक्षेप घेणारे आणि हा चौक बंद ठेवावा, अशी मागणी करणारी अनेक निवेदने प्राप्त होत आहेत.
४याबाबतचा अभ्यास सुरू असून, चौक पूर्ण वेळ बंद ठेवायचा अथवा काही तास, याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
आयुक्तालय हद्दीबाहेर सट्टा
गतवर्षी नरेश पोतलवाड आणि बुकींवर कारवाई केल्यानंतर तो पुन्हा आयपीएल सामन्यावर सट्टा सुरू करील असे आपणास वाटले नव्हते का, यावर आयुक्त म्हणाले की, दोन महिन्यांपूर्वी त्यास बोलावून आम्ही समज दिली होती. आयुक्तालय हद्दीबाहेर त्याने अड्डा सुरू केल्याची माहिती होती. त्यामुळे कारवाई करता आली नाही. त्याने आर. बी. हिल्स येथे अड्डा सुरू केल्याची माहिती मिळताच आम्ही धाड मारली.

Web Title: Nanded of Netaji, Dharmabad connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.