नांदेड जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचार्‍यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 17:29 IST2018-02-23T17:27:29+5:302018-02-23T17:29:39+5:30

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने कंत्राटी कर्मचार्‍यां संदर्भात ९ फेब्रुवारी रोजी काढलेल्या परिपत्रकाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील विविध विभागातील कंत्राटी अधिकारी व कर्मचार्‍यांच्या वतीने आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 

In Nanded district contract workers rally on collector's office | नांदेड जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचार्‍यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

नांदेड जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचार्‍यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

नांदेड : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने कंत्राटी कर्मचार्‍यां संदर्भात ९ फेब्रुवारी रोजी काढलेल्या परिपत्रकाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील विविध विभागातील कंत्राटी अधिकारी व कर्मचार्‍यांच्या वतीने आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 

सकाळी महात्मा फुले  पुतळयापासून या मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चात जिल्ह्यातील विविध विभागात काम करणारे कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. राज्य शासनाच्या विविध विभागात मागील अनेक वर्षापासून कंत्राटी पद्धतीने कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु, शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढलेला शासन निर्णय या कर्मचार्‍यांना दिलासा देणारा नसल्याने शासनाच्या या भूमीकेविरोधात हे आंदोलन असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले.

Web Title: In Nanded district contract workers rally on collector's office