मनपाने पाच घरांचे नळ तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 21:50 IST2019-03-02T21:41:05+5:302019-03-02T21:50:00+5:30
महापालिकेकडे पाणीपट्टी न भरणाऱ्या जुना बाजार येथील ५ घरांची नळजोडणी तोडण्यात आली

मनपाने पाच घरांचे नळ तोडले
औरंगाबाद : महापालिकेकडे पाणीपट्टी न भरणाऱ्या जुना बाजार येथील ५ घरांची नळजोडणी तोडण्यात आली, तर थकीत मालमत्ता करापोटी पडेगाव येथे एक मालमत्ता सील करण्यात आली. मनपाकडून आगामी दिवसांत मालमत्ता कर वसुलीची मोहीम तीव्र केली जाणार आहे. होळीचा दिवस वगळता वॉर्ड कार्यालये ३१ मार्चपर्यंत अगदी सुटीच्या दिवशीही सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहेत. नागरिकांनी कर भरून जप्ती किंवा मालमत्ता सील करण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.