शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

‘नांमका’तून गुरुवारी पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 1:19 AM

वैजापूर, गंगापूर तालुक्याला फायदा : पाणीचोरी रोखण्यासाठी दंगा काबू पथकाची नियुक्ती

वैजापूर : नांदूर -मधमेश्वर जलद कालव्यातून पाणी सोडण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार २१ फेब्रुवारीला ‘नांमका’तून १.२७ टीएमसी पाणी वैजापूर आणि गंगापूर तालुक्याला सोडले जाणार आहे. विशेष म्हणजे हे पाणी आवर्तन पिण्यासाठी आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाणी चोरी करणाऱ्यांवर २४ तास करडी नजर ठेवण्यासाठी चक्क पोलिसांचे दंगा काबू पथक तैनात करण्याची वेळ जलसंपदा विभागावर आली आहे. दरम्यान, या आवर्तनामुळे पाणीटंचाईची झळ सोसणाºया लाभक्षेत्रातील १०२ गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.यंदा वैजापूर तालुक्यावर दुष्काळाचे ढग गडद होऊ लागले आहेत. या गंभीर परिस्थितीशी दोन हात करण्याची वेळ प्रशासनासह आपणा सर्वांवर निसर्गाने आणली आहे. त्यातच सर्वात मोठे संकट पिण्याच्या पाण्याचे असून तालुक्यातील सगळेच जलसाठे हिवाळ्यातच कोरडे पडले आहेत. त्यामुळे आहे ते पाणी वाचविण्यासाठी प्रशासनाने मोठी खबरदारी घेतलेली आहे. नांदूर -मधमेश्वर जलद कालव्यातून कि.मी.शून्य ते कि.मी ७० या अंतरात वरील भागातील शेतकरी मुख्य कालव्यातून बेसुमार पाण्याची चोरी आवर्तनादरम्यान करतात. त्यामुळे वैजापूर अणि गंगापूर तालुक्यांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही. तर काही गावे पाण्यापासून वंचित राहतात. त्यामुळे उपलब्ध कमी अधिक प्रमाणात मिळणाºया पाण्यावरून लाभक्षेत्रातील शेतकºयात संघर्ष होतो. हा पाणी चोरीचा प्रकार थांबविण्यासाठी यंदा प्रशासनाने जो प्रयत्न कालव्यात पाण्याचा विसर्ग सुरु राहणार तो पर्यंत पोलिसाचे दंगा काबू पथक तैनात करणार असल्याचे जलसंपदा विभागातील अधिकाºयांचे म्हणणे आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ‘नांमका’चे आवर्तन मिळण्यासाठी आ. भाऊसाहेब पा. चिकटगावकर, शेतकरी मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजीव डोंगरे यांनी आंदोलने करुन सतत औरंगाबाद व नाशिक पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केला होता; तसेच माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी अणि भाजपचे ज्येष्ठ नेते मोहनराव आहेर यांनी थेट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन तालुक्यातील शेतकºयांची व्यथा मांडली होती. शिवसेनेकडूनही पाणी सोडण्यासाठी नेते मंडळी आक्रमक झाले होते. पण नांदूर मधमेश्वर जलद कालव्यातून सोडण्यात येणार, पिण्याच्या पाण्याचे आरक्षण व पाण्याच्या मागणीचा अभाव ही कारणे पुढे करत तसेच शिल्लक पाणी पिण्यासाठी राखीव ठेवल्याने हे आवर्तन मार्च किंवा एप्रिलमध्ये सोडण्याचे धोरण जिल्हा प्रशासनाने अवलंबले होते. मात्र, सततच्या पाठपुराव्यामुळे व काही प्रमाणात शेतकºयांकडून मागणी अर्ज आल्याने अखेर २१ फेब्रुवारीला हे आवर्तन नांदूर मधमेश्वर कालव्यातून सोडण्यात येणार असल्याने शेतकरी आनंदीत झाले आहेत. दरम्यान, शेतकºयांनी आवर्तनातील पाण्याने पिण्यासाठी गावाजवळचे पाझर तलाव भरून घ्यावेत, असे आवाहन ‘नांमका’ विभागाने केले आहे.चाºया, पोटचाºयांची दुरवस्थानांदूर मधमेश्वर कालव्यातील लाभक्षेत्रातील गावांमधील अनेक ठिकाणच्या चाºया, पोटचाºया अपूर्णावस्थेत असल्यामुळे देखील शेतकºयांना पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे. यंदा वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात या वर्षी जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या प्रमाणात अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे लाभक्षेत्रातील पाझर तलाव कोरडेठाक असून विहिरींनीदेखील तळ गाठलेला असल्यामुळे हे आवर्तन शेतकºयांसाठी आवश्यक आहे.वैजापूर तालुक्यातील ८२ गावांत पाणीटंचाईवैजापूर तालुक्यावर यंदा वरुणराजाने अवकृपा केल्याने सुमारे ८२ गावांत पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. मन्याड मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यात प्रशासनाला अपयश आल्याने पाणीचोर मोकाट झाले आहेत. तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे १२४ टँकर सुरू आहेत, तर ८७ विहिरी अधिग्रहित करून पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. येणाºया एप्रिल आणि मे महिन्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. तालुक्यात काही गावांना वर्षभर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाई