शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जीवन गौरव पुरस्कारासाठी पाच जणांची नावे जाहीर

By admin | Updated: August 20, 2014 00:55 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५६ वा वर्धापन दिन २३ आॅगस्ट रोजी शनिवारी मोठ्या थाटात साजरा केला जाणार

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५६ वा वर्धापन दिन २३ आॅगस्ट रोजी शनिवारी मोठ्या थाटात साजरा केला जाणार असून, त्या दिवशी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. विजय भटकर, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. यू. म. पठाण, सिंचन व कृषी क्षेत्रात विजयअण्णा बोराडे, आरोग्य व संशोधन क्षेत्रातील डॉ. हिम्मतराव बावस्कर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रदीर्घ सहवास लाभलेले सामाजिक कार्यकर्ते एल. आर. बाली या पाच महनीय व्यक्तींना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.यासंदर्भात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले की, विद्यापीठाची प्रतिमा देशपातळीवर उंचावण्यासाठी या वर्षापासून जीवन गौरव पुरस्काराची परंपरा सुरू करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तींचे संपूर्ण देशभर कार्यक्षेत्र गृहीत धरले जाणार आहे. पुढे ते आंतरराष्ट्रीय पातळीवरचे कार्यक्षेत्र समजले जाईल. २३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वा. विद्यापीठ नाट्यगृहात हा समारंभ होईल. त्यामध्ये पुरस्कारप्राप्त व्यक्तींना मानपत्र, स्मृतिचिन्ह दिले जाईल. या विद्यापीठाकडून मान्यवरांच्या काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेतले जाईल. त्यांच्या सूचना व सल्ल्यानुसार विद्यापीठाचा विकास साधला जाईल. दरम्यान, २३ आॅगस्ट रोजी सकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान विद्यापीठ परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचे अभियान राबविले जाईल.