नामांकित शाळांनी अतिरिक्त शिक्षक नाकारले

By Admin | Updated: December 11, 2014 00:46 IST2014-12-11T00:10:36+5:302014-12-11T00:46:20+5:30

शांतीलाल गायकवाड, औरंगाबाद सुधारित आकृतिबंधामुळे अतिरिक्त ठरलेल्या खासगी शाळांतील १७४ शिक्षकांना शहरातील नामांकित खासगी शिक्षण संस्थांनी सामावून घेण्यास चक्क नकार दिला आहे.

Named schools rejected additional teachers | नामांकित शाळांनी अतिरिक्त शिक्षक नाकारले

नामांकित शाळांनी अतिरिक्त शिक्षक नाकारले

शांतीलाल गायकवाड, औरंगाबाद
सुधारित आकृतिबंधामुळे अतिरिक्त ठरलेल्या खासगी शाळांतील १७४ शिक्षकांना शहरातील नामांकित खासगी शिक्षण संस्थांनी सामावून घेण्यास चक्क नकार दिला आहे. त्यामुळे या संस्थांकडील संबंधित विषयांची रिक्त पदे कायमची व्यपगत (रद्द) का करण्यात येऊ नयेत, अशी कारणे दाखवा नोटीस
जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी बजावली आहे.
जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्थांतील १७४ शिक्षक व २२४ शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले आहेत. अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाने चालविला आहे. ५२ शिक्षकांचे समायोजन खासगी संस्थांतून करण्यात आले आहे. ७० शिक्षकांना औरंगाबाद महापालिकेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. महापालिकेने शिक्षक देण्याची मागणी शिक्षण उपसंचालकांकडे केली होती. त्यानुसार उपसंचालकांमार्फतच महापालिकेला समायोजनाविषयी कळविण्यात आले आहे; परंतु ७० शिक्षकांचे समायोजन करण्यास पालिके नेही अद्याप होकार कळवलेला नाही. ६० शिक्षकांना जिल्हा परिषदेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या शाळांनी कळविला नकार
श्रेयस बालक मंदिर, अलमीर उर्दू (प्रत्येकी शिक्षक ३), मॉन्टेसरी बालक मंदिर, सरस्वती भुवन प्राथमिक शाळा, झमझम उर्दू या शाळांतून प्रत्येकी एका शिक्षकाचे समायोजन करण्यात येणार होते; परंतु या शाळांनी सदर शिक्षकांना रुजू करून घेण्यास असमर्थता दर्शविली, अशी माहिती प्रभारी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी दिली.
ते म्हणाले, या संस्थांकडे सदर जागा रिक्त आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे शिक्षकांचे समायोजन करण्याचा निर्णय झाला होता; परंतु संस्थांनी नकार दिल्यामुळे त्यांच्याकडील रिक्त जागा कायमस्वरूपी व्यपगत का करण्यात येऊ नयेत, अशा कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

Web Title: Named schools rejected additional teachers