सेव्हन हिल चौकाला तरुणसागरजींचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:39 IST2018-09-05T00:39:33+5:302018-09-05T00:39:56+5:30
राष्ट्रसंत जैन मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांच्या नावाने सेव्हन हिल उड्डाणपुलाखालील चौक विकसित करण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी मंजूर करण्यात आला.

सेव्हन हिल चौकाला तरुणसागरजींचे नाव
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राष्ट्रसंत जैन मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांच्या नावाने सेव्हन हिल उड्डाणपुलाखालील चौक विकसित करण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी मंजूर करण्यात आला. यासंदर्भात समाजबांधवांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी नमूद केले. तरुणसागरजी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रस्ताव राजू शिंदे यांनी मांडला. त्याला उपमहापौर विजय औताडे, राजू वैद्य, भाऊसाहेब जगताप, प्रमोद राठोड, गजानन बारवाल, राखी देसरडा यांनी अनुमोदन दिले. शिंदे यांनी सेव्हन हिल येथील चौकाचे तरुणसागरजी महाराज चौक असे नामकरण करण्यात यावे, असा प्रस्ताव दिला. त्यावर चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी समाजबांधव पाच लाखांपर्यंत आर्थिक मदत करण्यास तयार आहेत, असे सभागृहनेते विकास जैन यांनी सांगितले. सेव्हन हिलसोबतच वेदांतनगर चौक, एन-१ चौकांचा विचार करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली.