ग्रामपंचायतींचे नाव ऑनलाईन नसल्याने उमेदवारांचे टेंशन वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 16:25 IST2020-12-24T16:25:00+5:302020-12-24T16:25:34+5:30

नामनिर्देशनपत्र २३ ते ३० डिसेंबरपर्यंत स्विकारण्याचा कालावधी आहे.

As the name of the gram panchayat is not online, the tension of the candidates has increased | ग्रामपंचायतींचे नाव ऑनलाईन नसल्याने उमेदवारांचे टेंशन वाढले

ग्रामपंचायतींचे नाव ऑनलाईन नसल्याने उमेदवारांचे टेंशन वाढले

ठळक मुद्दे कन्नड तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींची नावे पोर्टलवर नाहीत

कन्नड :  तालुक्यातील ८३ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया बुधवार (दि २३) पासुन सुरु झाली आहे. मात्र तालुक्यातील कळंकी, अंबा, औराळा, तळणेर, वाकद, लामणगाव, माटेगाव, धामणी खुर्द व सायगव्हाण या ९ ग्रामपंचायतींची नावे अर्ज दाखल करण्याच्या पोर्टलमध्ये समाविष्ट नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ऑनलाईन नामनिर्देशनपत्र दाखल करुन ऑनलाईन केलेली कागदपत्रे व अनामत रक्कम संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करावी लागते. बुधवारी संकेतस्थळ बंद होते. गुरुवारी संकेतस्थळ सुरु झाले. त्यावेळी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी गेलेल्या कळंकी, अंबा, औराळा, तळणेर, वाकद, लामणगाव, माटेगाव, धामणी खुर्द व सायगव्हाण येथील इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठीच्या ऑनलाईन पोर्टलवर आपल्या ग्रामपंचायतचे नावच नसल्याचे पाहून धक्काच बसला. उमेदवारांनी तात्काळ तालुकानिवडणुक अधिकारी तथा तहसिलदार संजय वारकड यांना हा प्रकार निदर्शनास आणून दिला.

वेळ आणि पैसा वाया जात आहे 
ग्रामपंचायत निवडणुकीची अधिसूचना १५ डिसेंबरलाच जारी झाली आहे. नामनिर्देशनपत्र २३ ते ३० डिसेंबरपर्यंत स्विकारण्याचा कालावधी आहे. त्यातही तीन दिवस सुट्या आहेत. गावाचे नावच नसल्याने नामनिर्देशनपत्र कसे दाखल करावे असा प्रश्न आहे. आमचा वेळ आणि पैसा खर्च होत आहे असे कळंकी येथील माजी उपसरपंच भाऊसाहेब साळूंके यांनी सांगितले.

तांत्रिक अडचण आहे
ही एक तांत्रिक अडचण असून दुरुस्तीचे काम सुरु आहे. तीन दिवस सुट्या असल्या तरी उमेदवार ऑनलाईन फॉर्म भरू शकतील अशी माहिती तालुका निवडणुक अधिकारी तथा तहसिलदार संजय वारकड यांनी सांगितली. 

Web Title: As the name of the gram panchayat is not online, the tension of the candidates has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.