शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

Namantar Andolan : ‘पँथर्सनी प्रारंभापासून ते शेवटपर्यंत नामांतर किल्ला लढवला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:18 PM

लढा नामविस्ताराचा : ‘पँथर्सनी जेल भोगले, मार खाल्ला, संसार सोडले, नोकऱ्या सोडल्या, सर्वस्वी त्याग केला. दलितांचे आक्राळ विक्राळ रूप पाहून सरकारला नामांतर करणे भाग पडले. म्हणून स्वताकदीवर जिंकलेल्या या स्वाभिमानी लढाईचा प्रत्येक दलितास अभिमान वाटतो’ असे नामांतर लढ्याचे अग्रणी व माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांनी सांगितले. 

- स. सो. खंडाळकर

गंगाधर गाडे हे नामांतर लढ्याचे अग्रणी राहिले आहेत. कितीतरी मोर्चे, आंदोलने, सत्याग्रह करून त्यांनी शेवटी नामविस्तार पदरात पाडून घेतला. या लढ्यातल्या एक ना अनेक कितीतरी आठवणी त्यांच्याकडे. एका दमात काय आणि किती सांगणार! पण ते सांगण्यापेक्षा या लढ्यातल्या प्रत्येकालाच त्यांनी केलेला त्याग, संघर्ष माहीत आहे. ते किती लढाऊ पँथर होते, त्यांची झेप कशी भल्याभल्यांना गारद करीत होती, हा स्वतंत्र  विषय होऊ शकतो. नामांतर लढ्यातील गंगाधर गाडे यावरच एक भले मोठे पुस्तक होऊ शकते. आजही गंगाधर गाडे आणि नामांतर हे समीकरण कुणी विसरू शकत नाही. 

१९७७ साली तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील बीडचा कार्यक्रम आटोपून औरंगाबाद मार्गे मुंबईकडे जाणार होते. विमानतळाच्या रस्त्यावर मी आणि पँथर कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडले. मी स्वत: वसंतदादांच्या गाडीवर झेप घेतली. गाडीसमोर आडवा पडलो. त्याचवेळी पोलिसांनी लाठीमार सुरू केला. अशाही वेळी मी वसंतदादा पाटील यांची गाडी ओढत होतो. माझी बोटे चिरली. 

हात रक्तबंबाळ झाला. अंगावर जखमा झाल्या. पोलिसांच्या लाठ्यांनी संपूर्ण शरीर हिरवे-निळे झाले. रक्त गोठले. या आंदोलनात महिला आपल्या कच्च्याबच्च्यांसह आडव्या पडल्या. कोवळी बालके गाडीसमोर भिरकावण्यात आली. उस्मानपुरा भागातील जमनाबाई गायकवाड यांची मुलगी कायमची अपंग झाली, असा अंगावर शहारे आणणारा प्रसंग गाडे यांनी यावेळी कथन केला. नामविस्ताराच्या रौप्य महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते ‘लोकमत’शी बोलत होते.त्यांनी सांगितले, महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळावे हे स्वप्न पाहत होतो.

नवस्थापित पँथरचे सरचिटणीस या नात्याने ही मागणी मी ७ जुलै १९७७ रोजी केली. या मागणीसाठी पत्रके वाटणे, निदर्शने करणे, शिष्टमंडळे घेऊन जाणे, सभा-बैठका आयोजित करणे हे सातत्याने सुरू ठेवले. वसंतदादा पाटील यांच्या सूचनेनुसार ही मागणी एखाद्या समाजापुरती मर्यादित ठेवू नका. तिला व्यापक रूप द्या आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे असे की, ही मागणी विद्यापीठामार्फत केली तर आणखी बरे होईल. तेव्हापासून ते नामविस्तार करण्यापर्यंतच्या घटना घडामोडींचा मी साक्षीदार राहिलो. किंबहुना यात माझी कामगिरी व मी केलेला संघर्ष ठळक राहिला. 

नांदेडला गौतम वाघमारे यांनी स्वत:ला जाळून घेऊन आत्मदहन केले. त्या घटनेने तर पुन्हा महाराष्ट्र हादरला. नामांतरासाठी वेळोवेळी केलेले बंद, काढलेले मोर्चे आजही आठवतात. बाबासाहेबांसारख्या महामानवाच्या नावासाठी, सामाजिक समतेसाठी, परिवर्तनासाठी, दलितांच्या स्वाभिमानासाठी १६ वर्षे हा लढा लढावा लागला. त्यासाठी खस्ता खाव्या लागल्या. अनेकांना जिवाची कुर्बानी द्यावी लागली.  

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा