नालेसफाई मनपाच करणार
By Admin | Updated: April 20, 2016 00:43 IST2016-04-20T00:34:10+5:302016-04-20T00:43:59+5:30
औरंगाबाद : मान्सूनला अजून दीड महिन्याचा अवकाश असला तरी मनपा प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

नालेसफाई मनपाच करणार
औरंगाबाद : मान्सूनला अजून दीड महिन्याचा अवकाश असला तरी मनपा प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. शहरातील सर्व नाल्यांची सफाई ठेकेदारामार्फत न करता मनपाने स्वत: करावी, असा आदेश मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिला आहे. यापूर्वी नालेसफाईच्या नावावर दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी प्रशासनाकडून करण्यात येत होती.
शहरात १२ मोठे नाले आहेत. मागील काही वर्षांमध्ये नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. नाल्यांची अवस्था आता नालीसारखी झाली आहे. महापालिका दरवर्षी नालेसफाईच्या नावावर कोट्यवधी रुपये कंत्राटदारांच्या घशात घालत आहे. कंत्राटदार नाल्यांमधील केरकचरा काढतात. ही साफसफाई फक्त दर्शनी भागात होते. नाल्यांमधील गाळ काढण्यात येत नाही. पावसाच्या पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळवून देण्याचे काम दरवर्षी होते. मोठा पाऊस झाल्यास सखल भागात घरांमध्ये नाल्याचे पाणी साचते. शहरात एकूण १२ प्रमुख नाले असून, त्यांना जोडणाऱ्या नाल्यांची संख्या सुमारे २६ आहे. नाल्यांच्या दर्शनी भागातच सफाई होते, अशी ओरड नागरिकांकडून होते. संपूर्ण नाल्यांची लांबी ५२ ते ६० किलोमीटरपर्यंत आहे. यंदाही नालेसफाई मनपाच्या कर्मचारी व यंत्रणेकडूनच करावी, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी हे काम संपले पाहिजे, असेही त्यांनी वॉर्ड अधिकाऱ्यांना सांगितले.