जड अंत:करणाने नकुल, दुर्गा जोडीने सोडले औरंगाबाद...
By Admin | Updated: January 17, 2016 00:05 IST2016-01-16T23:58:00+5:302016-01-17T00:05:01+5:30
औरंगाबाद : सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील नकुल आणि दुर्गा या पिवळ्या वाघाच्या जोडीची शनिवारी दोन वेगवेगळ्या ट्रकमधून मध्यप्रदेशातील सतनाकडे रवानगी करण्यात आली.

जड अंत:करणाने नकुल, दुर्गा जोडीने सोडले औरंगाबाद...
औरंगाबाद : सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील नकुल आणि दुर्गा या पिवळ्या वाघाच्या जोडीची शनिवारी दोन वेगवेगळ्या ट्रकमधून मध्यप्रदेशातील सतनाकडे रवानगी करण्यात आली. पण त्याआधी या वाघांना पिंजऱ्यात हलविण्यासाठी प्राणिसंग्रहालय कर्मचाऱ्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली. इथेच जन्मलेल्या या जोडीला जणू इतरत्र हलविण्याची चाहूल लागली होती. म्हणूनच की काय सुरुवातीला कितीही प्रयत्न केले तरी ते दुसऱ्या पिंजऱ्यात जाण्यास तयार नव्हते. शेवटी दीड तासाच्या प्रयत्नानंतर दोन्ही वाघ दुसऱ्या पिंजऱ्यात शिरले आणि त्यानंतर हे पिंजरे ट्रकमध्ये ठेवून त्यांचा पुढील प्रवास सुरू झाला.
मध्यप्रदेशातील सतनापर्यंत तब्बल १०१८ किलोमीटरचा प्रवास करून हे वाघ मंगळवारी सायंकाळी मुकुंदपूर प्राणिसंग्रहालयात पोहोचणार आहेत. ही जोडी गेल्यामुळे सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात आता सात पिवळे आणि तीन पांढरे वाघ उरले आहेत.
पिवळ्या वाघांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांची एक जोडी मुकुंदपूर प्राणिसंग्रहालयास देण्याचे आदेश काही दिवसांपूर्वीच सेंट्रल झू अॅथॉरिटीने औरंगाबाद मनपा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार नकुल आणि दुर्गाची जोडी घेऊन
प्रजननचा मार्ग मोकळा
वाघांची संख्या जास्त झाल्यामुळे येथील प्राणिसंग्रहालयात दोन वर्षांपासून त्यांच्या प्रजननावर बंधने घालण्यात आली होती. नर आणि मादींना जाणीवपूर्वक वेगवेगळे ठेवण्यात येत होते. मात्र, आता नकुल आणि दुर्गाची जोडी गेल्यामुळे येथील वाघांची संख्या पूर्वीपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे राहिलेल्या वाघांच्या मीलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच येथील नर आणि मादींना एकत्र ठेवले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
मुकुंदपूर प्राणिसंग्रहालयात वास्तव्य
मध्यप्रदेशच्या वन विभागाचे पथक पिवळ्या वाघाच्या जोडीला घेऊन शनिवारी सकाळी १० वाजता रवाना झाले. आता या दोन्ही वाघांचे वास्तव्य सतना येथील मुकुंदपूर प्राणिसंग्रहालयात असणार आहे. औरंगाबाद ते सतना हे अंतर तब्बल १०१८ किलोमीटरचे आहे.
४हा प्रवास चार दिवसांत पूर्ण केला जाणार आहे. त्यामध्ये शनिवारी कारंजा, रविवारी खावसा आणि सोमवारी मैय्यर येथे मुक्काम असणार आहे. त्यानंतर मंगळवारी सायंकाळपर्यंत हे पथक वाघांसह मुकुंदपूर प्राणिसंग्रहालयात पोहोचेल. मुकुंदपूर प्राणिसंग्रहालयाचे उद्घाटन पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.