शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल, डायरीतून उलगडणार पेपरफुटीचे रहस्य

By admin | Updated: November 6, 2014 01:37 IST

औरंगाबाद : यवतमाळ जिल्हा परिषदेच्या भरतीच्या पेपर विक्री प्रकरणाचा सूत्रधार असलेला आरोपी मकरंद खामणकर याने अटकेच्या वेळी फेकलेले आपले

औरंगाबाद : यवतमाळ जिल्हा परिषदेच्या भरतीच्या पेपर विक्री प्रकरणाचा सूत्रधार असलेला आरोपी मकरंद खामणकर याने अटकेच्या वेळी फेकलेले आपले दोन मोबाईल आणि डायरी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी बुधवारी जालना रोडवरील लाडगाव टोलनाक्याजवळ शोधून काढली. या दोन्ही वस्तू सापडल्यामुळे या पेपर फुटीमागे असलेल्या मुख्य सूत्रधारांचे रहस्य आता उलगडणार आहे. या दोन्ही वस्तूंमधून या गुन्ह्यातील महत्त्वपूर्ण माहिती समोर येऊ शकते, असे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले. यवतमाळ जि. प.त सुमारे १०० पदांसाठी २ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत परीक्षा घेण्यात येणार होती. या परीक्षेच्या उत्तरपत्रिका फोडणाऱ्या आणि लाखो रुपये घेऊन त्या विक्री करणाऱ्या टोळीतील ११ आरोपींना आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी रात्री औरंगाबादेत मोठ्या शिताफीने अटक केली. पेपर विक्रीचा सूत्रधार असलेला आरोपी मकरंद खामणकर याने अटकेच्या वेळी आपले दोन मोबाईल आणि एक डायरी लाडगाव टोलनाक्याजवळ फेकली होती, असे पोलीस तपासात समोर आले. त्यानंतर बुधवारी पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक कृष्णा शिंदे, पोलीस कर्मचारी महेश उगले, दादासाहेब झारगड यांनी लाडगाव टोलनाक्याजवळ जाऊन सर्व परिसर पिंजून काढला. या उत्तरपत्रिका फुटी प्रकरणात यवतमाळ येथील काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. कोणत्याही शासकीय भरतीसाठी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका सेट करण्यासाठी एक समिती नियुक्त केलेली असते. ४या समितीत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असतो. या पेपरफुटी प्रकरणात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्यामुळेच या उत्तरपत्रिका आरोपींपर्यंत पोहोचल्या, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या दिशेनेही आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्याचे सूत्रांनी सांगितले.