गूढ आवाजाने हादरले पारगाव
By Admin | Updated: November 28, 2014 01:10 IST2014-11-28T00:17:29+5:302014-11-28T01:10:55+5:30
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव व परिसरात बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मोठा गूढ आवाज झाला़ अचानक घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली असून,

गूढ आवाजाने हादरले पारगाव
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव व परिसरात बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मोठा गूढ आवाज झाला़ अचानक घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली असून, एका घराच्या काचाही आवाजामुळे फुटल्या आहेत़
पारगाव व परिसरात गत काही महिन्यांपासून गूढ आवाज येण्याचे प्रमाण वाढले आहे़ नेहमीप्रमाणेच बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मोठा गूढ आवाज झाला़ यापूर्वी झालेल्या घटनांपेक्षा हा आवाज मोठा असल्याने अनेकांनी घरातून बाहेर धाव घेतली़ तर पांडुरंग कोकाटे यांच्या घराच्या खिडकीच्या काचाही या आवाजामुळे फुटल्या़ सातत्याने होणाऱ्या गूढ आवाजाचे कोडे उलगडत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये दहशत पसरली आहे़ त्यामुळे प्रशासनाने याची योग्यप्रकारे शहानिशा करून संभ्रम दूर करावा, अशी मागणी होत आहे़ (वार्ताहर)