विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू

By Admin | Updated: July 2, 2014 00:26 IST2014-07-01T23:22:19+5:302014-07-02T00:26:41+5:30

बदनापूर : तालुक्यातील भिलपुरी येथील मायलेकीचा एका विहिरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना १ जुलै रोजी घडली.

Myelike death drowned in the well | विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू

विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू

बदनापूर : तालुक्यातील भिलपुरी येथील मायलेकीचा एका विहिरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना १ जुलै रोजी घडली.
वंदना सुरेश तुपे (वय ३२) व तिची मुलगी निकिता सुरेश तुपे (वय ४) या दोघी मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घरातून बाहेर गेल्या. त्यानंतर त्या घरी परतल्या नसल्यामुळे त्यांचा शोध घेतला असता गावाजवळच असलेल्या बाबूराव त्रिबंक तुपे यांच्या विहिरीत या मायलेकीचे मृतदेह आढळले. सदर प्रकरणी श्रीराम माणिक तुपे यांच्या खबरीवरून बदनापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोउपनि राजपूत हे करीत आहेत.
मुलीचा विनयभंग
बदनापूर तालुक्यातील जवसगाव शिवारात ३० जून रोजी दुपारी साडेअकरा वाजेच्या एक अल्पवयीन मुलगी शेतात जात असताना रस्त्यात तिचा विनयभंग करण्यात आला व तिला मारहाण करून धमक्या दिल्या. सदर प्रकरणी या मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गणेश सूर्यभान गारखेडे (रा. जवसगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ शिवणकर हे करीत आहेत.

Web Title: Myelike death drowned in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.