शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

माझी शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी फोडली, तरीही यांना भीती; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 11:15 IST

नकली शिवसेना म्हणणाऱ्या गद्दारांना धडा शिकवा : मविआच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : आम्हाला नकली शिवसेना म्हणणाऱ्या गद्दारांना धडा शिकवा, असे आवाहन शुक्रवारी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील प्रचंड जाहीर सभेत केले. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि जालना लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार डाॅ. कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि मोदी सरकारवर सडकून टीका केली.

दुपारी शहरात झालेल्या अवकाळी पावसाने वातावरण बदलून गेले गेले होते. संध्याकाळीही पाऊस येतो की काय, अशी शंका असताना या सभेस चांगला प्रतिसाद मिळाला. संपूर्ण मैदान भरून गेले होते. तब्बल पंचेचाळीस मिनिटांच्या भाषणात ठाकरे यांनी भाजप नेत्यांवर व एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली. कधी मला तर कधी शरद पवार यांना डोळा मारतात, पण आम्ही त्यांच्या प्रेमात पडणार नसल्याची स्पष्ट ग्वाहीही ठाकरे यांनी उपस्थितांच्या टाळ्यांच्या कडकडाटात दिली. माझी शिवसेना फोडली, शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली, तरीही यांना माझी भीती वाटते, असा टोला त्यांनी मारला. मुस्लिमांची लोकसंख्या वाढली, हे तुमचं यश की अपयश, असा प्रश्न ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. पंतप्रधानांची भाषा महाराष्ट्र खपवून घेणारच नाही, असा इशारा त्यांनी दिला.

आता जरा आराम घ्या.जरा आराम घ्या. कपालभाती करा, डोक्याला पतंजलीचं तेल लावा, असा सल्ला देत ठाकरे यांनी तुमच्या विकासाच्या इंजिनला भ्रष्टाचाराची चाके असल्याचा टोला नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

खैरे उपस्थितांसमोर नतमस्तकचार वेळा खासदार असताना चंद्रकांत खैरे यांनी काय केले या प्रश्नाचे उत्तर अंबादास दानवे यांनी कामांची यादी वाचून दिले. तसेच मुख्यमंत्री असताना छत्रपती संभाजीनगर शहरासाठी काय काय केले हेही विस्ताराने सांगितले. संदीपान भुमरे यांच्या आवाजातील क्लीप दानवे यांनी ऐकवली. उद्धव साहेब सांगतील तर सहाव्या मजल्यावरून ही मी उडी मारेन, असं भुमरे म्हणाले होते. पैठणचं पार्सल पैठणला पाठवा, असे आवाहन अनिल पटेल यांनी करताच टाळ्या पडल्या.  मनोगत व्यक्त करून मंचावरूनच चंद्रकांत खैरे उपस्थितांसमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद मागितले.

उद्धव ठाकरे यांनी केले संविधान पूजन सभा सुरू होण्यापूर्वी शाहीर सुरेश जाधव व संचाने पोवाडे गाऊन चैतन्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, माॅंसाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. स्वतः उद्धव ठाकरे यांनी संविधानाचे पूजन केले. या सभेत मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष रमेश गायकवाड, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार प्रा. किशोर पाटील, काॅंग्रेसचे माजी राज्यमंत्री अनिल पटेल व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भाषणे झाली. उद्धव ठाकरे मंचावर आल्यानंतर उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादjalna-pcजालनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४