शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

आईच माझी गुरू

By admin | Updated: July 12, 2014 01:00 IST

सुरेखा महाजन, बालपणापासून तिने आम्हाला स्पष्टवक्तेपणा आणि निर्भीडपणा शिकविला. आज मी जी काही आहे ती केवळ अन् केवळ माझ्या आईमुळेच.

सुरेखा महाजन, बालपणापासून तिने आम्हाला स्पष्टवक्तेपणा आणि निर्भीडपणा शिकविला. आज मी जी काही आहे ती केवळ अन् केवळ माझ्या आईमुळेच. त्यामुळे माझी आई ‘सुमन’ हीच माझी खरी गुरू आहे. आज ती आमच्यात नाही. मात्र, तिची शिकवण सदैव माझ्यासोबत आहे, असे सांगताना औरंगाबाद उच्च न्यायालय वकील संघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष अ‍ॅड. सुरेखा महाजन यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.अ‍ॅड. महाजन म्हणाल्या की, मला कळते तेव्हापासून आईच्या स्वभावात असलेला तडकाफडकीपणा, स्पष्टवक्तेपणा तसेच तिची अचाट बुद्धिमत्ता आणि निर्भयता हे गुण आमच्यासाठी वरदान ठरले. तिच्या छत्रछायेखाली आम्हा भावंडांचे व्यक्तिमत्त्व विकसित झाले. तिचे मन स्वच्छ आणि सुंदर होते. पदव्युत्तर शिक्षणानंतर पुरुषप्रधान व्यवसाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वकिली व्यवसायात पदार्पण क रण्याच्या माझ्या निर्णयाला तिने मला पाठिंबा दिला. एवढेच नव्हे तर पदोपदी नैतिक बळही दिले. सुख आले तरी हुरळून जाऊ नये आणि दु:खाच्या प्रसंगी स्वत:ला सावरण्याचे बळही आम्हाला तिच्याकडूनच मिळालेले आहे. एका अर्थाने जीवन जगण्याची कलाच तिने आम्हा भावंडांना शिकविली. २ आॅक्टोबर २०१३ रोजी काळाने तिला आमच्यापासून हिरावून घेतले, हे सांगताना अ‍ॅड. महाजन यांना गहिवरून आले. आईसोबतच आदर्श गुरू आणि मैत्रीण होती. जीवनातले प्रत्येक क्षण तिच्यासोबत शेअर करीत असू. तसेच तिच्यापासून आमची कोणतीही गोष्ट कधीच लपून राहत नव्हती. अशा वात्सल्यसिंधू गुरूला गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने त्रिवार नमन.