रांजणगावात माय-लेकावर चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 23:12 IST2019-07-06T23:12:26+5:302019-07-06T23:12:36+5:30
हळदीच्या कार्यक्रमात नातेवाईकांसोबत वाद घालणाऱ्या तरुणाने मध्यस्थी करणाºया तरुणासह त्याच्या आईवर चाकूहल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री रांजणगाव येथे घडली.

रांजणगावात माय-लेकावर चाकू हल्ला
वाळूज महानगर : हळदीच्या कार्यक्रमात नातेवाईकांसोबत वाद घालणाऱ्या तरुणाने मध्यस्थी करणाºया तरुणासह त्याच्या आईवर चाकूहल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री रांजणगाव येथे घडली. या घटनेत माय-लेक जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोघांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैशाली राजाराम जाधव (३७, रा. ओमसाईनगर, रांजणगाव) यांचा मुलगा सागर याचा मित्र अमोल चौधरीच्या घरी शुक्रवारी रात्री हळदीचा कार्यक्रम होता. कार्यक्रमात सूरज भारत राठोड याने इतर नातेवाईकांसोबत वाद घालत मारहाण केली. तेव्हा सागरने मध्यस्थी करीत वाद मिटविला.
दरम्यान, कार्यक्रम आटोपून रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सागर घरी आला असता सूरज राठोड व त्याची आई हे सागरच्या घरी आले. दोघांनी सागरला शिवीगाळ केली. तेव्हा वैशाली जाधव समजावून सांगत असताना माय-लेकांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच सूरजने दोघांवर चाकूहल्ला केला. यात माय-लेक गंभीर जखमी झाले असून, त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी वैशाली जाधव यांच्या तक्रारीवरुन वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात सूरज राठोड व त्याची आई या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.