शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

'मी नव्हे तर पतीच माझ्या विरोधात'; शिवशक्ती सेनेच्या बांधणीसाठी करुणा मुंडेंचा राज्यभर दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 18:02 IST

पक्ष वाढीसाठी राज्यभर दौरे करणार आहे. मात्र, काही हितशत्रु मला रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत.

वाळूज महानगर ( औरंगाबाद ) : मी नव्हे तर पतीच माझ्या विरोधात आहेत, असे मत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा-मुंडे यांनी मंगळवारी (दि.१८) वाळूजमहानगरात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. आपले शिवशक्ती सेना पक्ष बांधणीसाठी राज्यभर दौरे सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे या बैठकीनिमित्त औरंगाबादेत आल्या होत्या. मात्र या बैठकीला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने त्यांनी वाळूजमहानगरातील एका हॉटेलात पत्रकार परिषद घेऊन भुमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, मी शिवशक्ती सेना पक्ष काढला असून या पक्षांच्या माध्यमातुन महिला, शेतकरी, उसतोड कामगार यांचे प्रश्न सोडविण्यात येतील. पक्ष वाढीसाठी राज्यभर दौरे करणार आहे. मात्र, काही हितशत्रु मला रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यातील घराणेशाही संपवून राजकारणात वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यातील महिलावरील अत्याचारात वाढ होत चालली असून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाकडे राज्यशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सचिन डोईफोडे, भारत भोसले, विद्या अभंग, रवी गवळी, आदींची पत्रकार परिषदेला उपस्थिती होती.

शरद पवारांची भेट झाली नाही आपण २५ वर्षानंतर घराबाहेर पडल्याचे सांगत करूणा मुंडे म्हणाल्या, मेरी लडाई किसीसे नही मै, मै अपने पती के खिलाफ नही हुँ. बल्की पतीही मेरे खिलाफ है. मी कोणत्याही पक्षासोबत हातमिळवणी केलेली नसून माझी लढाई अन्याय-अत्याचाराच्या विरोधात आहे. कौटुंबिक कलहातुन मार्ग काढण्यासाठी शरद पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र भेट झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. पंकजा मुंडेविषयी बोलण्याचे त्यांनी टाळले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेAurangabadऔरंगाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेसPankaja Mundeपंकजा मुंडे