औरंगाबाद : ‘माय-दादा, काहीही करा; पण बुधवारी बोटाला शाई लावाच’, ‘काका-काकू तुम्हीही न चुकता मतदान करा,’ असे शाळकरी मुलांच्या मनावर बिंबविणे, पथनाट्याद्वारे मतदानाचे महत्त्व सांगणे, बँकांचे दस्तऐवज, जीटीएलचे बिल, गॅस सिलिंडर आदींवर ‘मी मतदान करणारच’ असे स्मरण देणारी स्टीकर्स डकविण्यासह विविध पद्धतींनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाने जनजागृती मोहिमेला गती दिली आहे. विधानसभेसाठी बुधवारी (दि.१५) राज्यात मतदान होत आहे. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष कक्षातर्फे मंगळवारी (दि.७) विद्यापीठाच्या नाट्यगृहात जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक, पर्यवेक्षिका आणि निवडक विस्तार अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली.मतदार जनजागृती कक्षाचे प्रमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, गंगापूरचे गटविकास अधिकारी विश्वनाथ केळकर, ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष एल.जी. गायकवाड, राष्ट्रीय समाजसेवाचे प्रा. राजेश करपे, टी.आर. पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ग्रामसेवकांनी काय-काय करावे, कोणत्या पद्धतीने करावे, याची माहिती मान्यवरांनी दिली. त्यात मतदार याद्यांचे वाचन, त्यातील मृतांचा शोध घेणे, बाहेरगावी कामानिमित्त गेलेल्या मतदारांना गावी बोलावून घेणे, दोनदा आलेली नावे शोधणे, मतदार चिठ्ठ्या घरोघरी पोहोचविणे आदी प्राथमिक कामे त्वरित उरकावीत, असे सांगण्यात आले. ‘मी मतदान करणारच, अशी शपथ घेतो,’ या वाक्याची स्टीकर्स, रबरी स्टॅम्प तयार करून घेण्यात आले आहेत.
‘माय-दादा, काही करा, बोटाला शाई लावाच...’
By admin | Updated: October 8, 2014 01:06 IST
औरंगाबाद : मतदान करणारच’ असे स्मरण देणारी स्टीकर्स डकविण्यासह विविध पद्धतींनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाने जनजागृती मोहिमेला गती दिली आहे.
‘माय-दादा, काही करा, बोटाला शाई लावाच...’
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}