मुस्लिम आरक्षणासाठी बीडमध्ये ‘शोलेस्टाईल’
By Admin | Updated: December 30, 2014 01:17 IST2014-12-30T01:04:40+5:302014-12-30T01:17:35+5:30
बीड : आरक्षणासाठी राज्यकर्ते ठोस पाऊले उचलत नाहीत, असा आरोप करुन येथे शिवसंग्राम मुस्लिम आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मोबाईल टॉवरवर चढून ‘शोलेस्टाईल’ आंदोलन केले़

मुस्लिम आरक्षणासाठी बीडमध्ये ‘शोलेस्टाईल’
बीड : आरक्षणासाठी राज्यकर्ते ठोस पाऊले उचलत नाहीत, असा आरोप करुन येथे शिवसंग्राम मुस्लिम आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मोबाईल टॉवरवर चढून ‘शोलेस्टाईल’ आंदोलन केले़
शिवसंग्राम मुस्लिम आघाडीने यापूर्वी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते़ त्यानंतर सोमवारी सकाळी कार्यकर्ते मोमीनपुरा भागात एकत्र आले़
त्यांनी मोबाईल टॉवरवर चढून सरकारविरुद्ध संताप व्यक्त केला़ मराठा समाजाच्या आरक्षणाचा ठराव सरकारने घेतला;परंतु मुस्लिम समाजाचा मात्र विसर पडला़ निवडणुकीत मुस्लिमांबद्दल कळवळा दाखविणाऱ्यांनी आता आरक्षणात अन्याय करुनये, अशी मागणीही करण्यात आली़ आंदोलकांच्या घोषणांनी परिसर दणाणला़ आंदोलकांना पाहण्यासाठी टॉवरभोवती मोठी गर्दी झाली होती़
या आंदोलनात खय्यूम इनामदार, शेख अमर, मोहसीन खान, जगन्नाथ भोसले, शेख फेरोज आदी सहभागी झाले होते़
दरम्यान, या आंदोलनाची माहिती मिळाल्यावर तहसीलदार ज्योती पवार, पेठ बीड ठाण्याचे निरीक्षक़ श्रीकांत हरगबाळ तेथे गेले़ त्यांनी आंदोलकांना माघार घेण्यास सांगितले़ त्यानंतर ते सर्वजण खाली आले़ (प्रतिनिधी)