शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्यक्ष वाद्यातून निर्माण झालेले संगीत हृदयाचा ठाव घेते: पद्मविभूषण डॉ. इलायाराजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 19:54 IST

अकराव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल पद्मविभूषण इलायाराजा यांना पद्मपाणी पुरस्काराने सन्मानित केले.

छत्रपती संभाजीनगर : संगीतामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. यंत्रावर बोटे फिरवून संगीत दिले जाते. त्यात तांत्रिकता येते. ते संगीत कानापर्यंत पोहोचते. मात्र, सगळ्या वादकांनी प्रत्यक्ष वाद्य वाजवून निर्माण केलेले संगीत तुमच्या कानापर्यंतच पोहोचत नाही, तर तुमच्या हृदयाचा ठाव घेते, असे प्रतिपादन ज्येष्ठ भारतीय संगीतकार पद्मविभूषण डॉ.इलायाराजा यांनी केले.

अकराव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन एमजीएम संस्थेतील रुक्मिणी सभागृहात बुधवारी (दि.२८) सायंकाळी साध्या पद्धतीने करण्यात आले. यावेळी भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल पद्मपाणी पुरस्काराने पद्मविभूषण इलायाराजा यांना सन्मानित केले. यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएमचे कुलपती अंकुशराव कदम, ऑस्कर विजेते ध्वनी संयोजक रसूल पुक्कुट्टी, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, संयोजक नीलेश राऊत, सचिन मुळे, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर यांची उपस्थिती होती.

यावेळी इलायाराजा म्हणाले, संगीताच्या विद्यार्थ्यांनी यंत्रावर वाद्य वाजविण्यापेक्षा प्रत्यक्ष वाद्य शिकली पाहिजेत. वाद्य शिकले नाही, तर ऐतिहासिक परंपरा असलेल्या भारतीय वाद्याला पुढे घेऊन कोण जाणार? असा सवाल उपस्थित केला. माझ्या संगीतामध्ये सर्व काही लाइव्ह वाद्य, वादक असतात. त्या ठिकाणी आम्ही काढलेल्या नोट्सच्या आधारे वाद्य साथ देतात. आमच्या आर्केस्ट्रामध्ये ८८ वादक आहेत. जेव्हा संगीत दिले जाते, तेव्हा त्यात वादक वाद्यांच्या आधारे त्यात जीव ओतत असतात. त्यातून संगीतात जिवंतपणा येतो. तो जिवंतपणा इलेक्ट्रिक वाद्यात नसतो, असेही त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप अंकुशराव कदम यांना केला. रसूल पुक्कुट्टी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक सुनील सुकथनकर यांनी केले. कार्यक्रमात अभिनेत्री भाग्यश्री बोरसे हिचा दाक्षिणात्य चित्रपटातील कारकिर्दीसाठी विशेष सन्मान करण्यात आला.

१,५४५ चित्रपटांना संगीत तरीही शिक्षण सुरूचआज विमानात बसण्यापूर्वी १,५४५व्या चित्रपटाला संगीत देऊन आलो आहे. एवढ्या चित्रपटांना संगीत दिले असले, तरी आणखी शिक्षण सुरूच असल्याचे इलायाराजा यांनी सांगितले. यावेळी सभागृहातील एका तमिळी रसिकाने त्यांना गीत सादर करण्याचे साकडे घातले. तेव्हा त्यांनी संस्कृत पद म्हटले.

अजित पवार यांच्या निधनाचे सावटआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातात झालेल्या निधनाचे सावट होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच अजित पवार यांना उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली. त्याशिवाय कार्यक्रमात पुष्पगुच्छ देऊन कोणाचाही सत्कार करण्यात आला नाही. देश-विदेशातील १०० पेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित राहिल्यामुळे महोत्सव स्थगित करता आला नाही, असेही संयोजकांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Live music touches the heart: Padmavibhushan Dr. Ilaiyaraaja at festival.

Web Summary : Dr. Ilaiyaraaja emphasized live instruments' emotional depth versus technology. He highlighted the importance of learning traditional instruments and praised the Ajanta-Ellora film festival, mentioning his orchestra's 88 musicians, and his ongoing musical education despite scoring 1,545 films.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर