खून प्रकरणात दोघेजण जेरबंद
By Admin | Updated: July 12, 2016 00:53 IST2016-07-12T00:48:08+5:302016-07-12T00:53:48+5:30
उस्मानाबाद : न्यायालयाच्या आदेशावरून दाखल असलेल्या खून प्रकरणात शहर पोलिसांनी दोघा आरोपिंना सोमवारी अटक केली़ अटकेतील दोघांना न्यायालयात हजर केले

खून प्रकरणात दोघेजण जेरबंद
उस्मानाबाद : न्यायालयाच्या आदेशावरून दाखल असलेल्या खून प्रकरणात शहर पोलिसांनी दोघा आरोपिंना सोमवारी अटक केली़ अटकेतील दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील बुकनवाडी येथील परमेश्वर बुकन यांचा २५ मे २०१५ रोजी अपघाती मृत्यू झाला होता़ या प्रकरणी शहर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़ मयताची आई काशिबाई बुकन यांनी या प्रकरणात अॅड़ अजित खोत यांच्या मार्फत मुलाचा खून झाल्याची फिर्याद दिली होती़ या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून नृसिंह बुकन, पांडुरंग गलांडे, खंडेराव गलांडे या तिघाविरूध्द ६ फेब्रुवारी रोजी शहर ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या प्रकरणाचे तपास अधिकारी फौजदार संग्राम जाधव यांनी सोमवारी या प्रकरणात खंडेराव गलांडे व पांडुरंग गलांडे या दोघांना अटक केली़ अटकेतील दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १५ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ तपास फौजदार संग्राम जाधव हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)