भावानेच केला खून

By Admin | Updated: April 6, 2017 23:39 IST2017-04-06T23:34:51+5:302017-04-06T23:39:55+5:30

भोकरदन : तालुक्यातील कठोरा बाजार येथे पत्नीच्या नावावर एक एकर जमीन का केली या कारणावरून सख्या भावाने भावास लोखंडी गजाने मारहाण केली होती. त्याचा ३१ मार्च रोजी मृत्यू झाला.

The murdered blood | भावानेच केला खून

भावानेच केला खून

भोकरदन : तालुक्यातील कठोरा बाजार येथे पत्नीच्या नावावर एक एकर जमीन का केली या कारणावरून सख्या भावाने भावास लोखंडी गजाने मारहाण केली होती. जखमी भावावर औरंगाबाद येथे औषध उपचार सुरू असताना त्याचा ३१ मार्च रोजी मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालानंतर भोकरदन पोलीस ठाण्यात ६ एप्रिल रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
कठोरा बजार येथील आब्बासखॉ मज्जितखॉ (४६ ) याने १० फेब्रुवारी रोजी भोकरदन पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती की, भाऊ अलीखॉ याने जमीन तुझ्या पत्नीच्या नावावर का केली या कारणावरून लोखंडी गजाने मारहाण केली होती. त्यावरून भोकरदन पोलिस ठाण्यात अलीखॉ यांच्या विरूध्द १२ फेबुरावारी रोजी ३२५,५०४,५०६ भा़द़वि प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली होती.
फिार्यादी आब्बासखॉ यांच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालाच्या आधारे ६ एप्रिल रोजी आरोपी अलीखॉ विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या आरोपीला खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात येईल असे सहाय्यक पोलिस निरीक्षक गोकुळसिंग बुंदेले यांनी सांगितले़

Web Title: The murdered blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.