वडगावात तरुणाला मारहाण : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 20:32 IST2019-02-16T20:32:13+5:302019-02-16T20:32:24+5:30
छेड काढल्याचा आरोप करून २४ वर्षीय तरुणास मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री वडगावात घडली.

वडगावात तरुणाला मारहाण : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
वाळूज महानगर : छेड काढल्याचा आरोप करून २४ वर्षीय तरुणास मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री वडगावात घडली. यात सचिन उबाळे हा जखमी झाला असून, त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सचिन उबाळे (२४ रा.बजाजनगर) व श्रीकांत साळे हे बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास वडगाव कोल्हाटी येथे हळदीचा कार्यक्रम बघण्यासाठी गेले होते. दरम्यान, काही वेळाने रामेश्वर भगत व दत्ता भगत (दोघेही रा.साजापूर) यांनी सचिनला मारहाण करण्यास सुरुवात केली. सचिनच्या मित्राचे वडील निवृत्ती साळे यांनी मध्यस्थी केल्याने दोघांच्या तावडीतून सचिनची सुटका झाली.
सचिनला शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी सचिन उबाळे याच्या फिर्यादीवरून रामेश्वर भगत व दत्ता भगत या दोघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.