माचनुरात महिलेची हत्या

By Admin | Updated: February 24, 2016 23:50 IST2016-02-24T23:46:39+5:302016-02-24T23:50:56+5:30

कुंडलवाडी : बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी ठाण्यांतर्गत माचनूर येथील एका महिलेस त्याच गावातील एका तरुणाने मारहाण केल्याने ती गंभीर जखमी होऊन नांदेड येथील एका खाजगी दवाखान्यात तिचा मृत्यू झाला.

The murder of a woman in Maunatur | माचनुरात महिलेची हत्या

माचनुरात महिलेची हत्या

कुंडलवाडी : बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी ठाण्यांतर्गत माचनूर येथील एका महिलेस त्याच गावातील एका तरुणाने मारहाण केल्याने ती गंभीर जखमी होऊन नांदेड येथील एका खाजगी दवाखान्यात तिचा मृत्यू झाला.
२० फेब्रुवारी शनिवारी रात्री आरोपी अबू पोचगोंड केरेकर याने मयत काळूबाई सयाराम परसुरे (रा. माचनूर , वय ४०) हिला जबर मारहाण केली. तिला जखमी अवस्थेत बिलोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर नांदेडच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान २२ च्या रात्री १०.४० वाजता तिचा मृत्यू झाला. फिर्यादी- लालू भूमगोंडा परसुरे यांच्या तक्रारीवरुन नांदेड शिवाजीनगर पोलिसांत नोंद घेण्यात येवून कुंडलवाडी ठाण्यात २३ च्या रात्री ९.३० वाजता आरोपी आबू पोचगोंडा केरेकर याच्यावर कलम २०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्काळ स.पो.नि. यु.एस. भापकर यांनी अवघ्या दोन तासांत आरोपीच्या भ्रमणध्वनी लोकेशनवरुन कुंडलवाडी शिवारात आरोपीस ताब्यात घेतले व अटक केली.
पथकात पोहेकॉ लतिफ , माधव पाटील, शेख शब्बीर, क्षीतीस भोसले, जिल्हेवाड यांचा समावेश होता. सदर महिलेची हत्या नेमकी कशामुळे झाली हे कळाले नाही.
(वार्ताहर)

Web Title: The murder of a woman in Maunatur