गुळज येथे महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:15 IST2017-10-18T00:15:29+5:302017-10-18T00:15:29+5:30

गुळज येथील शहेल शेख नामक महिलेचा सोमवारी रात्री संशयावरून गळा दाबून खून करण्यात आला, अशी फिर्याद तिचे वडील शेख रशीद शेख अब्दुल यांनी दिली.

Murder of a woman | गुळज येथे महिलेचा खून

गुळज येथे महिलेचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यातील गुळज येथील शहेल शेख नामक महिलेचा सोमवारी रात्री संशयावरून गळा दाबून खून करण्यात आला, अशी फिर्याद तिचे वडील शेख रशीद शेख अब्दुल (ह.मु खळेगाव) यांनी पोलीस चौकी उमापूर येथे दिली.
तालुक्यातील खळेगाव येथील शेख रशीद शेख अब्दुल यांची मुलगी शहेल (२६) हिचा विवाह गुळज येथील शेख अस्लम शेख याकुब यांच्याशी सात वर्षापूर्वी झाला होता. तिला चार मुले आहेत. एक मूल एक महिन्याचे आहे. मागील अनेक दिवसांपासून वादविवाद होत होता. गेल्या महिन्यात प्रसुतीसाठी आली असता पती अस्लम तिला घेऊन गेला. त्यानंतर सतत भांडण करत होता. सतत संशयावरून वाद होत होते.
सोमवारी रात्री भांडण झाले. यादरम्यान शहेलचा मृत्यू झाला. ही माहिती कळताच उमापूर चौकीचे पीएसआय जोगंदड जाऊन घटनास्थळी पंचनामा करुन उमापूर प्रा. आ. केंद्रामध्ये पीएमसाठी पाठवले. रात्री उशिरापर्यंत चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्याची प्रकिया चालू होती. दरम्यान मुलगी शहेल हिचा गळा दाबून खून करण्यात आला, अशी तक्रार तिच्या वडिलांनी दिली आहे.

Web Title: Murder of a woman