बायको-मुलांना सोडले, चार एकर जमीन विकली, तिनेच धोका दिल्याने काढला काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 11:42 AM2021-10-22T11:42:12+5:302021-10-22T11:48:10+5:30

अत्याचार केल्यानंतर मक्याच्या शेतातील चिखलात तोंड दाबून मारून टाकले.

murder of her due to leaving wife and children, sold four acres of land, and she cheated | बायको-मुलांना सोडले, चार एकर जमीन विकली, तिनेच धोका दिल्याने काढला काटा

बायको-मुलांना सोडले, चार एकर जमीन विकली, तिनेच धोका दिल्याने काढला काटा

googlenewsNext
ठळक मुद्देगुन्हे शाखेकडून आरोपी जेरबंदमारिया आल्हट हिची आत्महत्या नव्हे, हत्याच

औरंगाबाद : जिच्यासाठी बायको, मुलांना सोडले, चार एकर जमीन विकली, तिने दहा वर्षे सोबत राहिल्यानंतर म्हातारा झाल्याचे सांगून दुसरा प्रियकर पकडला. त्यामुळे संतापलेल्या माजी प्रियकराने तिला गोड बोलून शिवारात नेऊन मारून टाकले. त्यानंतर प्रेत विहिरीत टाकून दिले. ही घटना २३ सप्टेंबर रोजी घडली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांच्या पथकाला वाळूज एमआयडीसी परिसरात एका दुसऱ्या प्रकरणाच्या तपासासाठी ५ ऑक्टोबर रोजी पाठविले होते. त्यावेळी तेथे मारिया सुरेश आल्हट या महिलेची आत्महत्या नसून खून झाल्याचे समजले. गुन्हे शाखेने त्या दिशेने तपास सुरू केला. मारियासोबत शेवटच्या वेळी कोण संपर्कात होते, याची पडताळणी करण्यात आली. यात सुनील खरात याचे नाव समोर आले. चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र खाक्या दाखवताच गुन्हा कबूल केला. त्याने दिलेल्या माहितीनुसार, मारियाच्या पतीचे १२ वर्षांपूर्वी निधन झाले होते. तिला पतीपासून एक मुलगी होती. सुनीलच्या संपर्कात आल्यानंतर दोघे दहा वर्षांपासून पती-पत्नीसारखे राहत. तिच्यासाठी सुनीलने पत्नी, मुलांना सोडून दिले. चार एकर जमीन विकली.

मारियाला सुनीलपासून दोन मुले झाली. तरीही ती काही दिवसांपासून त्याच्यापासून दूर राहू लागली. आपण आता बहीण-भावासारखे राहू, तू म्हातारा झाला आहेस, असा तिने टोमणा मारला. दुखावलेल्या सुनीलने तिला संपविण्याचे ठरविले. याच कालावधीत त्याला मारियाचे सूत एका ठेकेदारासोबत जुळल्याचे समजले. यामुळे संतापलेल्या सुनीलने २३ सप्टेंबर रोजी तुला एकदाच भेटायचे आहे. यानंतर पुन्हा येणार नाही, असे सांगून तिला एकलहरा शिवारात नेले. तिच्यावर अत्याचार केल्यानंतर मक्याच्या शेतातील चिखलात तोंड दाबून मारून टाकले. त्यानंतर प्रेत विहिरीत टाकून दिले. हा गुन्हा पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त अपर्णा गिते यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक अमोल मस्के, सहायक फाैजदार सतीश जाधव, हवालदार सुधाकर मिसाळ, जितेंद्र ठाकूर, रवींद्र चरात, सुनील बेलकर, विजय पिंपळे आणि नितीन देशमुख यांच्या पथकाने उघडकीस आणला.

दोन मुले उघड्यावर
मारियाची सहा आणि अडीच वर्षांची दोन मुले उघड्यावर आली आहेत. मारियाच्या पहिल्या पतीपासून झालेली मुलगी व सुनीलच्या पहिल्या पत्नीचा मुलगा हे दोघेही संगनमताने पळून गेल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. अधिक तपास निरीक्षक संदीप गुरमे करीत आहेत.

Web Title: murder of her due to leaving wife and children, sold four acres of land, and she cheated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.