मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या कामाचा मनपाला विसर
By Admin | Updated: May 20, 2017 23:41 IST2017-05-20T23:38:14+5:302017-05-20T23:41:32+5:30
लातूर :यंदा मात्र मान्सूनपूर्व शहर स्वच्छतेच्या कामाचा विसर मनपाला पडला आहे़

मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या कामाचा मनपाला विसर
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : पावसाळ्यात नाल्यांमध्ये पाणी आडून घरात शिरण्याचा प्रसंग दरवर्षी उद्भवतो़ त्यामुळे मान्सूनपूर्व शहर स्वच्छतेची मोहीम राबविण्यात येते़ यंदा मात्र मान्सूनपूर्व शहर स्वच्छतेच्या कामाचा विसर मनपाला पडला आहे़
दरवर्षी ज्या भागात पाणी घरात शिरण्याच्या घटना घडतात, त्या भागातील नाल्या कचऱ्याने भरल्या आहेत़ त्याची स्वच्छता अद्याप केली नाही़ क्वाईल नगर परिसर, क्वाईल नगर झोपडपट्टी, नारायण नगर, संजय नगर, आनंद नगर, बरकत नगर आदी सखल भागात पावसाळ्यात नाल्या तुंबून घरात पाणी शिरते़ हा अनुभव असताना मनपाला विसर पडला आहे़