शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे अधिकारीच समन्वय ठेवत नाहीत

By admin | Updated: January 6, 2015 01:10 IST

औरंगाबाद : मनपाचे अधिकारी समन्वय ठेवत नसल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे खा.चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत समोर आले.

औरंगाबाद : मनपाचे अधिकारी समन्वय ठेवत नसल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे खा.चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत समोर आले. मनपा आणि कंपनीतील असमन्वयामुळे जलवाहिनीच्या कामाला उशीर होत असल्याचेही बैठकीत निष्पन्न झाले. पैठण ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनीचे काम तातडीने सुरू करण्यासाठी यावेळी कंपनी व मनपा अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. शिवसेनेचा औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला काहीही विरोध नाही. कंपनीने आधी काम करावे, नंतर पाणीपट्टी वसूल करावी, असे माजी आ. प्रदीप जैस्वाल म्हणाले. आयुक्त पी. एम. महाजन म्हणाले, कंपनीने तातडीने जलवाहिनीचे काम सुरू केले पाहिजे. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यानंतर कंपनीने मोफत टँकर दिले पाहिजेत. गळत्या दुरुस्त करून रेंगाळलेली कामे पूर्ण करण्याबाबत कंपनीला सूचना करण्यात आल्या. गळतीचे पाणी रस्त्यांवरून वाहते. त्यामुळे रस्त्यांचेही नुकसान होत असल्याचे कंपनीच्या निदर्शनास आणून दिले.यावेळी महापौर कला ओझा, सभागृह नेते किशोर नागरे, गटनेता गजानन बारवाल, विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड, मीर हिदायत अली, शहरप्रमुख राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, अनिल जैस्वाल, मोहन मेघावाले, गोपाळ कुलकर्णी, छाया वेताळ, सुनीता बरथुने, आगा खान, अनिल पोलकर, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, के. एम. फालक, यू.जी. शिरसाट, शिवाजी झनझन, कंपनीचे अरनाळ घोष, राम मुंदडा, कीर्तिकेयन, जहागीरदार उपस्थित होते.४शहर अभियंता एस. डी. पानझडे म्हणाले, बल्क वॉटर आणि हायड्रोक्लोरिक वर्क या दोन वेगळ्या बाबी आहेत. कंपनीने ही दोन्ही कामे वेगवेगळी केल्यास अडचण येणार नाही. यापुढील सर्व बैठकींना कंपनीचे प्रमुख अशोक अग्रवाल यांना उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले. पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची कारणे शोधावीत. तसेच कंपनीच्या मुंबई आॅफिसचे सर्वाधिकार येथील आॅफिसला देण्यात यावेत. शहरातील नवीन २३ जलकुंभांच्या जागा निश्चित करून त्या अंतिम केल्यावर डीपीआर मंजुरीकडे लक्ष देण्यात यावे. डीपीआर प्लॅनच्या मंजुरीअभावी काम सुरू करण्यास उशीर होतो आहे, असे कंपनी अधिकाऱ्यांनी सांगितले.