शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
7
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
8
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
9
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
10
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
11
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
12
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
13
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
14
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
15
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
16
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
17
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
18
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
19
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
20
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी

महापालिकेच्या नव्या वार्ड रचनेत ‘एमआयएम’चे १७ वॉर्ड आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 6:37 PM

विद्यमान नगरसेवकांमधील पन्नास टक्क्यांहून अधिक मंडळींचा पत्ता पक्षाकडून कट होण्याची दाट शक्यता आहे.

ठळक मुद्देपर्यायी वॉर्डांचा शोध ७० ते ७५ जागांचे नियोजन

औरंगाबाद : मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने मागील मनपा निवडणुकीत घवघवीत यश संपादन करून विरोधी पक्षनेतेपद मिळविले होते. विद्यमान पक्षाच्या २६ पैकी तब्बल १७ नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षणात तर काहींचे वॉर्ड खुल्या प्रवर्गात आले आहेत. त्यामुळे त्यांना सोयीचे पर्यायी वॉर्ड शोधण्याची वेळ आली आहे. विद्यमान नगरसेवकांमधील पन्नास टक्क्यांहून अधिक मंडळींचा पत्ता पक्षाकडून कट होण्याची दाट शक्यता आहे. यंदा पक्षाकडून ७० ते ७५ जागा लढविण्याचा विचार सुरू आहे. 

२०१५ च्या महापालिका निवडणुकीत एमआयएमने भाजपपेक्षा अधिक जागा मिळविल्या होत्या. महापालिकेत हा पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा ठरला होता. वॉर्ड रचना आणि आरक्षणामुळे पक्षाला बराच त्रास सहन करावा लागत आहे. विद्यमान २६ पैकी १७ जणांचे वॉर्ड आरक्षित झाले आहेत. त्यात काहींचे वॉर्ड खुल्या प्रवर्गात गेले आहेत. त्यामुळे खुल्या प्रवर्गात महिलांना संधी द्यावी का? हा सर्वात मोठा प्रश्न पक्षासमोर आहे. मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही एमआयएमचे तिकीट मिळविण्यासाठी पक्षात जोरदार स्पर्धा सुरू आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांकडून काम करून घेण्यासाठी मनपा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आमिष अनेकांना दाखविण्यात आले आहे. एका वॉर्डात आठ ते दहा जण इच्छुक आहेत. त्यातील तिकीट एकालाच मिळणार आहे. अनेक वॉर्डांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विद्यमान नगरसेवकांपैकी काहींना पक्षाकडून थेट तिकीट नाकारण्यात येणार आहे. त्यामुळे या नगरसेवकांनी आतापासूनच पर्यायी पक्षाचा आणि वॉर्डाचा शोध सुरू केला आहे. मागील पाच वर्षांमध्ये पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल काही नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टीही करण्यात आलेली आहे. 

एमआयएमचे १७ नगरसेवक कोणते?जमीर कादरी (आरेफ कॉलनी) यांचा वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. फेरोज खान (नवाबपुरा) यांचा वॉर्ड नागरिकांचा मागास वर्ग महिलेसाठी राखीव आहे. अय्युब जहागीरदार (अल्तमश कॉलनी) यांचा वॉर्ड खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. इरशाद हाजी (रहेमानिया कॉलनी) यांच्या वॉर्डावर नागरिकांचा मागासवर्ग महिला असे आरक्षण आहे. अज्जू नाईकवाडी (आविष्कार कॉलनी) यांचा वॉर्ड नागरिकांचा मागासवर्ग महिलेसाठी राखीव झाला. शेख जफर (इंदिरानगर उत्तर-जुना) हा वॉर्ड महिलेसाठी राखीव आहे. विकास एडके (खडकेश्वर) यांचा वॉर्ड नागरिकांचा मागासवर्ग महिलेसाठी राखीव आहे. गंगाधर ढगे (भडकलगेट) खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. नासेर सिद्दीकी (गणेश कॉलनी) खुल्या प्रवर्गातील महिला, साजेदा फारुकी (रोशनगेट-जुना) यांच्या वॉर्डाचा इतरत्र समावेश. संगीता वाघुले (आरतीनगर) वॉर्ड खुल्या प्रवर्गासाठी, नर्गीस सलीम (नेहरूनगर) वॉर्ड खुल्या प्रवर्गात, शेख समिना (संजयनगर) वॉर्ड खुल्या प्रवर्गात, नसीमबी सांडू खान (किराडपुरा) वॉर्ड खुला, अज्जू पहेलवान (शताब्दीनगर) वॉर्ड खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी, अजीम अहेमद (शरीफ कॉलनी) खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी, सय्यद मतीन (जयभीमनगर-आसेफिया कॉलनी) वॉर्ड ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. 

सूक्ष्म नियोजन सुरूमहापालिकेत बहुमतासाठी लागणाºया ५८ जागा कशा निवडून येतील यादृष्टीने पक्षाकडून रणनीती आखण्यात येत आहे. विद्यमान नगरसेवकांचे काही वॉर्ड आरक्षित झाले आहेत. त्यांना पर्यायी वॉर्ड शोधणे, नवीन सक्षम उमेदवार शोधणे आदी कामे पक्षाकडून सुरूआहेत. -शेख अहेमद, जिल्हाध्यक्ष, एमआयएम

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन