शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचारी गेला जिवानिशी; २ दिवसांनंतरही छत्रपती संभाजीनगरातील होर्डिंग्ज टांगलेलेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 19:51 IST

शहरात विजेचे खांब, रस्त्यांच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी तसेच धोकादायक आणि अतिजोखमीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर: अनधिकृत होर्डिंग काढताना शनिवारी मनपाचे कर्मचारी अमोल जाधव यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या घटनेला उलटून तीन दिवस उलटले तरी महापालिकेकडून ठोस पाऊल उचलले जात नसल्याचे चित्र आहे.

शिवजयंतीपूर्वी मनपा आयुक्तांनी दोन दिवसांत होर्डिंग काढून घेतले जातील, असे जाहीर केले, महापौरांनी तर सरसकट होर्डिंग्ज काढून टाका, अशी भूमिका घेतली. प्रत्यक्षात मनपा पुढाकार घ्यायला तयार नाही. सोमवारी सायंकाळी प्रशासनाने होर्डिंग लावणाऱ्यांना आणखी २४ तासांची मुदत दिली. शहरात विजेचे खांब, रस्त्यांच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी तसेच धोकादायक आणि अतिजोखमीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. हे फलक संबंधितांनी २४ तासांत काढून घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

होर्डिंग स्वतःहून काढून न घेतल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ चे कलम ३, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २४४ व २४५ तसेच अनधिकृत होर्डिंग किंवा बॅनरमुळे कोणतीही जीवितहानी, अपघात किंवा सार्वजनिक सुरक्षिततेस धोका निर्माण झाल्यास संबंधित व्यक्ती/संस्था यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. ज्यांनी हे होर्डिंग्ज सार्वजनिक ठिकाणी लावले आहेत. ते संबंधितांनी काढून घ्यावेत, असे आवाहन मनपा सतत करत असली तरी त्याला प्रतिसाद मिळत नाही.

सोमवारी शहरातील टीव्ही सेंटर, एम-२ रोड, जळगाव रोड, हडको कॉर्नर, हसूल टी पॉइंट, जटवाडा रोड, चिकलठाणा, बीड बायपास, रेल्वेस्टेशन, महावीर चौक, जालना रोड, क्रांती चौक, उस्मानपुरा, पड़ेगाव रोड आदी भागांत अनधिकृत होर्डिंग्ज झळकत होते.

'शॉक'ची भीतीवॉर्ड कार्यालयांनी शहरात अनधिकृत होडिंग हटवण्याची मोहीम हाती घेतली तरी सफाई कर्मचाऱ्यांकडे सुरक्षेची साधने नाहीत. काही होडिंग मनपाचे पथदिवे, काही महावितरणच्या पोलला लटकलेले असतात. चतुर्थ श्रेणी कर्मचारी होडिंग काढण्यासाठी सावध पवित्रा घेत आहेत.

कारवाई का नाही?अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची घोषणाही मनपाने केली होती. मागील तीन दिवसांमध्ये होर्डिंग न काढणाऱ्यांवर मनपाने कोणतीही कारवाई केली नाही. शहरातील प्रमुख 66 चौकातील बहुतांश होडिंग्ज संबंधितांनी काढून घेतले आहेत. आणखी काही लहान-मोठे होडिंग्ज दिसून येत असून, ते सुद्धा काढून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. होडिंग कोणाचे, हे बघितले जाणार नाही. माझ्या फोटोचे होर्डिंग असतील, तर ते अगोदर काढा; असे मी यापूर्वीच सांगितले. काही दिवसांमध्ये शहर होडिंगमुक्त दिसेल.- समीर राजूरकर, महापौर

थेट गुन्हे दाखल करुआमच्या 66 मृत्यू झालट आम्ही कोणाला ही सोडणार नाही. अजूनही अनधिकृत होर्डिंग्ज दिसत आहेत. काहींनी स्वतःहून काढून घेतले. ज्यांनी लावले, त्यांनीच ते धोकादायक होर्डिंग्ज काढून घ्यावेत. संबंधितांना आणखी एक २४ तासांची शेवटची संधी दिली जात आहे. त्यांनी नाही काढले तर आम्ही गुन्हे दाखल करू. जी. श्रीकांत, आयुक्त, मनपा.

या घोषणांचे काय झाले?दि. १६ फेब्रुवारी २०२६महापौरः आयुक्तांना हात जोडून विनंती करतो अनधिकृत होडिंग्ज काढून टाका. महापालिका आयुक्तः बॅनर काढायला गेले तर काढू नका म्हणून फोन व धमक्याही येतात.दि. २१ फेब्रुवारी २०२६महापौरः अनधिकृत होर्डिंग्जबाबत आता झीरो टॉलरन्स धोरण राहिल. महापालिका आयुक्तः अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्यावर गुन्हे दाखल करु.

English
हिंदी सारांश
Web Title : Municipal worker dies; hoardings still up in Sambhajinagar after days.

Web Summary : After a municipal worker's death removing illegal hoardings, Sambhajinagar authorities issued warnings but failed to act. Despite deadlines and threats of legal action, unauthorized hoardings remain, prompting public concern and highlighting administrative inaction.
टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMunicipal Corporationनगर पालिका