शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिका निवडणुकीचा आता उडणार बार; २८ दिवसांचा कार्यक्रम, यंत्रणा होणार बेजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 14:35 IST

१० नोव्हेंबरपासून ३ डिसेंबरपर्यंत प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामकाजात असेल.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सहा नगर परिषदा आणि १ नगर पंचायतीची निवडणूक होणार असून, त्या क्षेत्रात मंगळवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व नगर परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून, हा कार्यक्रम पूर्णत: धावपळीचा असल्यामुळे निवडणुकीचे कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुठलीही उसंत मिळणार नाही. शिवाय त्यांना प्रशिक्षण देखील घाई -घाईत द्यावे लागणार असून, २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ रोजी मतमोजणी असा कार्यक्रम असल्यामुळे यंत्रणा वैतागणार असल्याची प्रतिक्रिया प्रशासकीय वर्तुळात उमटतेय. 

१० नोव्हेंबरपासून ३ डिसेंबरपर्यंत प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामकाजात असेल. मतदान आणि मतमोजणीसाठी वेगवेगळे कर्मचारी नेमावे लागतील. तसेच मतदान यंत्र रात्रभर सांभाळून लगेच दुसऱ्या दिवशी मतमोजणी सुरू करावी लागणार असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची धावपळ होणार आहे.

प्रचाराला दोन आठवड्यांचा कालावधीउमेदवारांना प्रचाराला दोन आठवड्यांचा कालावधी असणार आहे. अ वर्ग नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारास ५ लाख, ब वर्ग न.प. उमेदवारास ३ लाख ५० हजार, तर क वर्ग न.प. निवडणुकीतील उमेदवारास २ लाख ५० हजारांचा खर्च प्रचारासाठी करता येईल. तर, नगर पंचायतीसाठी प्रत्येक उमेदवारास २ लाख २५ हजारांचा प्रचार रणधुमाळीसाठी करता येईल.

निवडणुकीचा कार्यक्रमउमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात - १० नोव्हेंबरअर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत - १७ नोव्हेंबरअर्जांची छाननी- १८ नोव्हेंबरअपील नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत - २१ नोव्हेंबरअपील असलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत -२५ नोव्हेंबरमतदानाचा दिवस - २ डिसेंबरमतमोजणीचा दिवस- ३ डिसेंबर

आचारसंहिता अशी असेलनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगर परिषद, पंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. न.प. कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू असली, तरी अन्य इतर ठिकाणीदेखील मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा करता येणार नाही. आचारसंहितेत शासनाला धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना, मदतीला आचारसंहितेचा आडकाठी असणार नाही.

जिल्ह्यातील किती नगर परिषदांच्या निवडणुका?नगर परिषद...................वर्ग.............प्रभाग संख्या.....सदस्य......महिला राखीव........ मतदारसंख्या..........सिल्लोड...............ब........................१४..................२८.........१४.....................५४,८०८वैजापूर...............ब............................१२...............२५..........१३......................४२,३३४पैठण..................ब.......................१२..................२५...........१३.......................३७,५४९कन्नड...........ब..........................१२..................२५...........१३.........................३७,७८०गंगापूर........क.............................१०................२०.............१०.........................२९,२८७खुलताबाद.....क........................१०.................२०............१०.............................१४,७७५फुलंब्री (नगर पंचायत)...............१७...............१७............९..................................१७,६३०एकूण...................................८७................१६०...........८२..............................२,३४,१६३

जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावानगर परिषदेच्या निवडणुका जाहीर होताच, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तातडीने आढावा घेतला. नगरपालिका प्रशासन, मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व यंत्रणेला त्यांनी सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Municipal Election Buzz Begins; 28-Day Schedule Strains Administration

Web Summary : Chattrapati Sambhajinagar municipal elections announced, code of conduct enforced. A tight 28-day schedule pressures staff. Voting on December 2nd, counting on 3rd. Two weeks for campaigning; spending limits set. District collector reviews preparations.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरElectionनिवडणूक 2024