शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

पैठणगेट परिसरात हत्येनंतर मनपाचा मोठा निर्णय; अनधिकृत, रस्ता बाधित बांधकामे काढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 14:57 IST

पैठणगेट भागातील विविध रस्त्यांवर मनपाकडून युद्धपातळीवर टोटल स्टेशन सर्वेक्षण करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर : पैठण गेटवर सोमवारी रात्री एका तरुणाचा भर रस्त्यात निर्घृणपणे खून करण्यात आला. या घटनेनंतर परिसरातील अतिक्रमणांवर एका समाजाने बोट ठेवले. त्यामुळे महापालिकेनेही तत्परतेने कारवाईला सुरुवात केली. गुरुवारी या भागातील मुख्य रस्त्यांचे टोटल स्टेशन सर्वेक्षण करण्यात आले. लवकरच या भागातील अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार आहे.

पैठणगेट परिसर मागील काही वर्षांत मोबाईल दुकानांचे ‘हब’ बनला आहे. या ठिकाणी मोबाईल विक्रेते, दुरुस्ती, ॲक्सेसरीज विक्रीची दुकाने वाढली आहेत. सोमवारी रात्री १०:३० वाजता एका मोबाईल दुकानात काम करणाऱ्या तरुणाने इम्रान अकबर कुरैशी (३३) याची दुकानासमोरच हत्या केली. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी कुरैशी समाजबांधवांनी मनपाच्या झोन क्रमांक २ मध्ये ठिय्या आंदोलन केले. अतिक्रमित दुकानांची तक्रार केली. मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाने ज्या दुकानांसमोर हत्या झाली, त्या दोन दुकानांवर नोटीस लावली. दोन दिवसांत मालकी हक्काची कागदपत्रे, बांधकाम परवानगी मागितली.

रस्ता रुंदीकरण मोहीमगुरुवारी मनपाच्या नगररचना विभागाने टोटल स्टेशन सर्वेक्षण केले. पैठणगेट ते सिल्लेखाना, पैठणगेट ते सब्जी मंडी व पैठणगेट ते खोकडपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर किती मालमत्ता रस्त्यात बाधित होतील, हे टोटल स्टेशन सर्वेक्षणानंतर स्पष्ट होणार आहे. पैठणगेट ते सिल्लेखाना चौक हा रस्ता ३० मीटरचा तसेच पैठणगेट ते सब्जी मंडी हा रस्ता ६ मीटरचा, पैठणगेट ते खोकडपुऱ्याकडे जाणारा रस्ता १५ मीटर रुंदीचा आहे. त्यानुसार रुंदीकरण केले जाणार आहे. नगर रचना विभागाचे राहुल मालखरे, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद यांच्या पथकाने हे टोटल स्टेशन सर्वेक्षण केले.

मनपा, पोलिसांची संयुक्त कारवाईपैठण गेट येथील खुनाच्या घटनेनंतर अनधिकृत दुकानांचा मुद्दा कुरैशी समाजाने उपस्थित केला. त्यामुळे महापालिका व पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई केली जाणार आहे. शनिवारी या भागात कारवाई होण्याची शक्यता असल्याचे अतिक्रमण हटाव विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Aurangabad: Illegal constructions near Paithan Gate to be removed after murder.

Web Summary : Following a murder near Paithan Gate, Aurangabad Municipal Corporation plans to remove unauthorized constructions obstructing roads. A survey is underway to determine affected properties, with joint action from the police and the corporation expected soon.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीEnchroachmentअतिक्रमण