शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

एसीबीची मोठी कारवाई; मनपाच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख, कर्मचारी लाच घेताना अटकेत

By सुमित डोळे | Updated: January 28, 2025 19:20 IST

मनपाच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख, कर्मचारी ७ हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ अटकेत

छत्रपती संभाजीनगर : वाळूज परिसरातील पेट्रोलपंपाला ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्विकारताना महानगरपालीकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी रायबा भगवान पाटील (५९) व त्यांचा तृतीय श्रेणी कर्मचारी वैभव विजय बाकडे (३८) यांना एसीबीने रंगेहाथ अटक केली. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता पदमपुऱ्यातील अग्निशमन विभागाच्या मुख्य कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. 

५२ वर्षीय व्यवसायिकाचे वाळूजलगत असलेल्या नारायणपूर बु. परिसरात पेट्रोपंप उभारणे नियोजित आहे. त्यासाठी अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र महत्वाचे असते.  गेल्या अनेक दिवसांपासून ते त्यासाठी पदमपुऱ्यातील अग्निशमन विभागात चकरा मारत होते. मात्र, पैशांसाठी त्यांचे काम अडवून ठेवण्यात आले. तीन दिवसांपूर्वी बाकडेने रायबा पाटील यांच्या नावाने पुन्हा त्यांना १० हजार रुपयांची मागणी केली. त्यांच्या छळामुळे संतापलेल्या ५२ वर्षीय व्यवसायिकाने याची थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अधीक्षक संदिप आटोळे यांच्याकडे तक्रार केली. आटाेळे यांच्या सुचनेवरुन उपअधीक्षक केशव दिंडे, निरीक्षक अमोल धस यांना तक्रारीची खातरजमा करण्याचे आदेश दिले. 

मंगळवारी थेट छापासोमवारी निरीक्षक अमोल धस यांना तक्रारीत तथ्य आढळले. मंगळवारी धस, अंमलदार युवराज हिवाळे यांनी सायंकाळी सापळ्याचे नियोजन केले. तक्रारदाराने पुन्हा रक्कम कमी करण्याची विनंती केली.  रायबा पाटीलने त्याच्या दालनात तडजाेडीअंती ७ हजार रुपये बाकडेकडे देण्याची सुचना केली. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी ५ वाजता बाकडे कार्यालयात सदर लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडला गेला. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. 

मनपाचा अग्निशमन विभाग हादरलासहा महिन्यांपूर्वी मनपाच्या अग्निशमन विभागातील आर्थिक व्यवहारांची जोरदार चर्चा उघड झाली होती. अग्निशमन विभागाच्या या अर्थकारणाकडे वरीष्ठांकडून देखील दुर्लक्ष केले गेल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढत गेल्याची चर्चा या कारवाईनंतर मनपा वर्तुळात सुरू होती.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाFire Brigadeअग्निशमन दल