महापालिकेत ८५ इच्छुकांचे अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2017 00:22 IST2017-04-02T00:22:02+5:302017-04-02T00:22:59+5:30
लातूर : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी ६५ जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे़

महापालिकेत ८५ इच्छुकांचे अर्ज दाखल
लातूर : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी ६५ जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे़ शुक्रवारी १९ तर गुरुवारी १ उमेदवाराने अर्ज दाखल केला होता़ निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत़
लातूर महानगर पालिकेच्या ७० जागांसाठी निवडणूक होत आहे़ या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पहिले तीन दिवस एकही उमेदवार मनपाकडे फिरकला नाही़ शनिवारी अर्ज दाखल करण्याचा पाचवा दिवस होता़ प्रमुख राजकीय पक्षांच्या याद्या अद्याप निश्चित झाल्या नसल्याने बहुतांश अपक्षांनीच उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़ शनिवारी सकाळपासून मनपाच्या आवारात उमेदवार व त्यांच्या समर्थकांची गर्दी होती़ अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिल्याने रविवार व सोमवारी क्षेत्रीय कार्यालयात गर्दी वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे़