मनपा बिल कलेक्टरचे आंदोलन अधांतरी
By Admin | Updated: March 18, 2016 00:17 IST2016-03-18T00:12:16+5:302016-03-18T00:17:46+5:30
नांदेड : थकीत वेतन देण्याची मागणी आणि अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणाचा निषेध करण्यासाठी महापालिकेया बिल कलेक्टरनी १७ मार्च पासून सुरू केलेले आंदोलन अधांतरीच लटकले आहे.

मनपा बिल कलेक्टरचे आंदोलन अधांतरी
नांदेड : थकीत वेतन देण्याची मागणी आणि अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणाचा निषेध करण्यासाठी महापालिकेया बिल कलेक्टरनी १७ मार्च पासून सुरू केलेले आंदोलन अधांतरीच लटकले आहे. महापालिकेसमोर निदर्शने करणाऱ्या बिल कलेक्टरांना उपायुक्तांनी चर्चेसाठी पाचारण केले मात्र चर्चेविनाच हे आंदोलन संपुष्टात आले.
कमी कर वसुली झाल्याचा ठपका ठेवत बिल कलेक्टरचे वेतन रोखण्याचे आणि त्यानंतर आता १४ मार्च रोजी झालेल्या बैठकीनंतर वार्षिक वेतनवाढ रद्द का करु नये अशी नोटीस मिळाल्यानंतर बिल कलेक्टरनी एकत्र येत प्रशासनाविरोधात बंडांचा झेंडा फडकवला. बिल कलेक्टर गुरुवारी सकाळपासून मैदानातही उतरले होते. मात्र या आंदोलनाला नेतृत्व कुणाचे या संभ्रमात असलेल्या बील कलेक्टरनी दुपारनंतर अचानक माघार घेतली. प्रारंभी उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी बिल कलेक्टरांना चर्चेसाठी पाचारण केले. त्यावेळी मनपा कर्मचारी युनियनचे नेते गणेश शिंगे हेही त्यांच्या समवेत उपायुक्तांच्या कक्षात गेले. त्यावेळी मुंडे यांनी आपण फक्त बिल कलेक्टरशी चर्चा करणार असल्याने इतरांनी कक्षाबाहेर जावे, असे फर्मान सोडले. त्यावेळी शिंगे यांच्यासह बिल कलेक्टरही चर्चेशिवाय कक्षाबाहेर आले. त्यानंतर बिल कलेक्टरनेही निदर्शने समाप्त केली.