शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

'समृद्धी'ला समांतर मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचे छत्रपती संभाजीनगरमधील कार्यालय गुंडाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 17:45 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील थाटलेले केंद्र दुसऱ्या यंत्रणेकडे

छत्रपती संभाजीनगर : मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाला समांतर अशा मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेच्या प्रस्तावित प्रकल्पाला गती मिळण्यासाठी भूसंपादनासह इतर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी सुरू करण्यात आलेले कार्यालय गुंडाळले आहे. या प्रकल्पाबाबत जिल्हा प्रशासनाला काहीही सूचना नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाचा अंतीम टप्पा १ मे पासून खुला होणार आहे. या महामार्गाला समांतर मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचा प्रकल्पही प्रस्तावित हाेता. मात्र, हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव गुलदस्त्यात गेला आहे. १११ किलोमीटरचा ट्रॅक समृद्धीलगत टाकण्यासाठी तीन वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर कार्यालय सुरू केले होते.

जिल्ह्यात हायस्पीड रेल्वेचा १११ किलोमीटर ट्रॅक समृद्धी महामार्गालगत बांधणीचा विचार होऊन तीन वर्षे झाली. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेडकडे (एनएचआरसीएल) यासाठी डीपीआर करणार होते. या प्रकल्पांतर्गत पर्यावरण संवर्धन, सामाजिक परिणाम, भूसंपादन प्रक्रिया, रेल्वेचा थांबा, मिळणारा मावेजा इ. विषयांवर अधिकारी, नागरिक, शेतकऱ्यांशी एमजीएमच्या सभागृहामध्ये चर्चा झाली होती. मात्र या प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर सुरू केलेले ऑफिसचे बोर्ड काढण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी लिडार सर्व्हे २०२१ मध्ये करण्यात आला होता.

हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावित प्रकल्प असा होताएकूण लांबी : ७४९ किलोमीटरकिती स्थानके? : १२किती जिल्हे जोडणार? : १०भूसंपादन किती? : १२४५.६१ हेक्टररेल्वेचा ताशी वेग किती? : ३३० ते ३५० किमीप्रवासी वाहतूक क्षमता : ७५०एकूण किती बोगदे? : १५, लांबी : २५.२३ किमीसमृद्धी महामार्गालगत १७.५ मीटर रुंदीचा मार्ग

१४ स्टेशन होते प्रस्तावित...अजनी, खापरी, वर्धा, पुलगाव, कारंजा लाड, मालेगाव जहाँगीर, मेहकर, जालना, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, नाशिक, घोटी बुद्रुक, शहापूर, ठाणे या १४ ठिकाणी एचएसआर स्टेशन बांधणे प्रस्तावित होते.

किती भूसंपादन लागणार होते ?३ तालुक्यांतील ४९ गावांलगत १११ किमी अंतरातून हायस्पीड रेल्वेचा मार्ग प्रस्तावित होता. त्यासाठी जिल्ह्यातून १६७.९६ हेक्टर भूसंपादन करण्यात येणार होते. ७३.७३ हेक्टर जमीन खासगी, तर ९४.२२ हेक्टर जमिनीसह सरकारी २०१ तर ४१० खासगी भूखंड लागणार होते. तालुक्यातील २३ गावांतील ६१.९४ हेक्टर, गंगापूरमधील ११ गावांतील ३७.१०, तर वैजापूरमधील १५ गावांतील ६७.९० हेक्टर भूसंपादनासाठी बैठक झाली होती.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरrailwayरेल्वे