बीड : विधानसभा निवडणुकीतील बहुरंगी लढतीने उमेदवारांच्या विजयाचे गणित बिघडणार आहे़ मतांच्या विभाजनाचा थेट परिणाम मताधिक्यावर होणार आहे़ मागील विधानसभा निवडणुकीत परळी, माजलगाव वगळता इतर ठिकाणी विजयी उमेदवारांना लाखाहून अधिक मते घ्यावी लागली होती़ यावेळी मात्र पाऊणलाख मते घेणाराही ‘विनींग’ उमेदवार ठरू शकतो़जिल्ह्यात विधानसभेच्या सहा मतदारसंघात १०९ उमेदवारांनी नशीब आजमावले़ त्या सर्वांचे भवितव्य बुधवारी मतदानयंत्रात बंद झाले आहे़ यापूर्वी युती- आघाड्यांमुळे ठिकठिकाणच्या मतदारसंघात ‘स्ट्रेट फाईट’ व्हायची़ यावेळी सर्र्वांनीच स्वबळाची परीक्षा दिली आहे़ २००९ मध्ये ६८ टक्के मतदान झाले होते़ वाढलेल्या मतदारांमुळे मतदानाच्या टक्क्यात तीनने भर पडली आहे़ मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने? याचे उत्तर रविवारी मिळणारच आहे़ तूर्त मतदानाच्या टक्केवारीवरून जय-पराजयाची आकडेमोड केली जात आहे़ विजय खेचून आणण्यासाठी यापूर्वी ८५ ते लाखाहून अधिक मते घ्यावी लागली होती़ यावेळी मतांचे विभाजन अटळ असल्याने मताधिक्य गडगडणार आहे़ ७५ हजार मते मिळविणाऱ्या उमेदवारालाही आमदारकीचा मान मिळू शकतो असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे़ जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा यांच्यात यापूर्वी थेट सामना रंगला होता़ शिवसेना व काँग्रेसला एका जागेवर लढण्याची संधी मिळाली होती़ यावेळी मात्र स्वतंत्र लढती आहेत़ मनसेचा देखील जिल्ह्यात काही प्रमाणात प्रभाव आहे़ मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर पडते ? हे पाहणे रोमांचक ठरत आहे़दरम्यान, कमी- अधिक प्रमाणात सर्वच मतदारसंघात अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता आहे़ ‘कट टू कट’ लढतीत कमी मतांच्या फरकाने उमेदवार एकमेकांना शह देऊ शकतात, अशीच काहीशी परिस्थिती आहे़मतदारसंघविजयी उमेदवार व मतेपराभूत उमेदवार व मतेगेवराईबदामराव पंडित (१००८१६)अमरसिंह पंडित (९८४६९)माजलगाव प्रकाश सोळंके (८६९४३)आऱ टी़ देशमुख (७९०३४)बीडजयदत्त क्षीरसागर (१०९१६३)सुनील धांडे (३३२४६)आष्टी सुरेश धस (११८८४७)बाळासाहेब आजबे (८४१५७)केज विमल मुंदडा (११०४५२)व्यंकटराव नेटके (६६१८८) परळीपंकजा मुंडे (९६२२२)प्रा़ टी़पी़ मुंडे (६०१६०)
बहुरंगी लढतीने मताधिक्य घटणार
By admin | Updated: October 17, 2014 00:27 IST