मान्सूनच्या तोंडावर गाळ काढण्याचे कंत्राट
By Admin | Updated: May 29, 2015 01:04 IST2015-05-29T00:57:50+5:302015-05-29T01:04:31+5:30
औरंगाबाद : हर्सूल तलावातील गाळ काढण्यासाठी वर्षभरापूर्वी महानगरपालिकेला मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून दोन कोटी रुपये देण्यात आले. या निधीतून यंदाच्या उन्हाळ्यात गाळ काढणे अपेक्षित होते

मान्सूनच्या तोंडावर गाळ काढण्याचे कंत्राट
औरंगाबाद : हर्सूल तलावातील गाळ काढण्यासाठी वर्षभरापूर्वी महानगरपालिकेला मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून दोन कोटी रुपये देण्यात आले. या निधीतून यंदाच्या उन्हाळ्यात गाळ काढणे अपेक्षित होते. परंतु संपूर्ण उन्हाळा निघून गेल्यानंतर आता पावसाळ्याच्या तोंडावर गाळ काढण्याचे दोन कोटींचे कंत्राट देण्याची तयारी पालिकेने केली आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे.
चार वर्षांपासून औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्याला दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गतवर्षी राज्य सरकारने तलावातील गाळ काढण्याची मोहीम मोठ्या प्रमाणावर हाती घेतली. त्याच वेळी हर्सूल तलावातील गाळ काढण्यासाठीही मनपाला मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. परंतु पालिकेने आतापर्यंत हा निधी खर्च केलेला नाही. यंदा डिसेंबरअखेरीस हा तलाव कोरडा पडला. त्यामुळे गाळ काढण्याची चांगली संधी पालिकेला मिळाली होती.
मात्र गाळ काढण्याचे कंत्राट आतापर्यंत देण्यात आले नाही. पालिकेतील सूत्रांनी दिलेल्या