कबड्डी स्पर्धेत एमएसएमचा संघ चॅम्पियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:51 IST2017-11-18T23:49:24+5:302017-11-18T23:51:40+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत आयोजित सेंट्रल झोन आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत एम.एस.एम. संघाने विजेतेपद पटकावले.

 MSM Team Champion in Kabaddi Tournament | कबड्डी स्पर्धेत एमएसएमचा संघ चॅम्पियन

कबड्डी स्पर्धेत एमएसएमचा संघ चॅम्पियन

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत आयोजित सेंट्रल झोन आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत एम.एस.एम. संघाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत ३२ संघांनी सहभाग घेतला होता. सुनील दुबिलेच्या तुफान चढाया व पकडी, ज्ञानेश्वर गुंजाळ, हरी कदम, विजय सारोळे, राजळे यांनी अफलातून कामगिरी करताना एम.एस.एम. संघाला विजेतेपद मिळवून दिले. विजेतेपद पटकावणाºया संघात सुनील दुबिले, ज्ञानेश्वर गुंजाळ, हरिद्वार कदम, विजय सारोळे, अक्षय चव्हाण, मच्छिंद्र राजोळे, आकाश येनवाल, प्रदीप राठोड, दत्तू अहिरे व सुनील आरे यांचा समावेश होता.
या संघाला डॉ. माणिक राठोड यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मीनाक्षी मुलिया, मंडळाचे अध्यक्ष राम पातूरकर, सचिव हेमंत पातूरकर, मकरंद जोशी, संकर्षण जोशी आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

Web Title:  MSM Team Champion in Kabaddi Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.