शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
3
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
4
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
5
NEET Paper Leak : पेपर विकणारेच नाही तर, लाखो रुपये खर्च करून विकत घेणारे पालकही सीबीआयच्या निशाण्यावर!
6
बापरे! मेक्सिकोमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, ६ पुरुष आणि एका लहान मुलासह १० जणांचा मृत्यू
7
प्रीती झिंटा-श्रेयस अय्यर यांच्यात गंभीर चर्चा; पाँटिंगही हताश! PBKS च्या ताफ्यात नेमकं काय घडलं?
8
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
9
अभिमानास्पद! कान्सच्या रेड कार्पेटवर अशोक-निवेदिता सराफ यांनी जपली मराठी संस्कृती, अशोकमामांच्या 'त्या' कृतीने जिंकली मनं
10
थेट टीव्ही स्टुडिओत एके-४७ ने गोळीबार! इराणच्या वृत्तवाहिनीवर थरार; 'युएई'च्या झेंड्यावर केला गोळीबार
11
​अमरावती हादरली! जुन्या वादातून तेजसची सपासप वार करत हत्या; गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हे शाखेकडून ३ आरोपींना २ तासांत बेड्या
12
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
13
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
14
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
15
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
16
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
17
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
18
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
19
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
20
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण मोकळेच !

By admin | Updated: September 25, 2014 00:54 IST

उदगीर : उदगीर शहर व परिसरात विनापरवाना चालणाऱ्या ७ आरामिलवर वनविभागाने कारवाई केली होती़ आरोपींना ताब्यात घेऊन अटकही करण्यात आली़


उदगीर : उदगीर शहर व परिसरात विनापरवाना चालणाऱ्या ७ आरामिलवर वनविभागाने कारवाई केली होती़ आरोपींना ताब्यात घेऊन अटकही करण्यात आली़ परंतु, ज्या महावितरणने या बेकायदा आरामीलला वीज जोडणी दिली ते मात्र अद्याप मोकळेच आहेत़
उदगीर शहर परिसरात गेल्या काही वर्षांपासून कोणतीही परवानगी न घेता आरामिल चालविण्यात येत होत्या़ यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली होती़ या याचिकेवरील निर्णयाच्या अनुषंगाने आठवडाभरापूर्वी वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक जी़एस़ साबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी ए़जी़ पाटील, आऱजी़ मुद्दमवार, वन परिमंडळ अधिकारी ए़बी़ पायाळ व कर्मचाऱ्यांनी बेकायदा आरामिलवर धाडी टाकल्या होत्या़ सात ठिकाणी धाडी टाकून तेथील मशीन्स वन विभागाने ताब्यात घेतल्या़ तसेच आरोपी शेख शमशोद्दीन रहीमोद्दीन पटेल, शेख खलील अब्दुल खादर, शेख इरफान उस्मानसाहब, शेख जियाऊल उस्मानसाहब, शेख बबलू अल्लाबक्ष, शेख युनूस शे़हबीब, महमद फारुख महमद ख्वाजा यांना अटक करुन न्यायालसमोर हजर करण्यात आले़ त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली़
दरम्यान, हे आरोपी आता जामिनावर सुटले आहेत़ गेली अनेक वर्षे विना परवाना आरामिल चालत असताना त्यांना महावितरणने सुरळीत वीजपुरवठा केला़ यासंदर्भात वनविभागाने महावितरणला वेळोवेळी पत्र पाठवून संबंधित आरामिल बेकायदा असल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याविषयी कळविले होते़ तरीही महावितरणने यावर कुठलीही कार्यवाही केली नाही़ त्यामुळे बेकायदा वृक्षांची कत्तल करुन आरामिल चालवणाऱ्या आरोपींना सहकार्य केल्याबद्दल महावितरणवरही गुन्हे नोंदविण्याची मागणी होत आहे़
१९८५ नंतर मराठवाड्यात एकाही आरामिलला परवानगी देण्यात आली नाही़ तरीही वर्षानुवर्षे बेकायदा आरामिल सुरु होत्या़ वनविभागाने कारवाया करुन उदगीरातील मिल बंद केल्या़ कुठल्याही दडपणाला बळी न पडता वन विभागाने अशाच कारवाया कराव्यात अशी अपेक्षा वृक्षमित्र डॉ़प्रकाश येरमे यांनी व्यक्त केली़ तसेच वन विभागाने वेळोवेळी पत्र देऊनही बेकायदा मिलधारकांची वीज खंडीत न करणाऱ्या महावितरणवर कार्यवाही व्हायलाच हवी, असे मतही वृक्षमित्र येरमे यांनी व्यक्त केले़